भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला. पण अजूनही त्याची लोकप्रियता मात्र जराही कमी झाली नाहीये. बुधवारी (१२ एप्रिल) पुन्हा एकदा याच गोष्टीचा प्रत्यय आला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. इंडियन प्रीमिअर लीगमधील १७व्या सामन्यात माहीची बॅट चांगलीच तळपली. त्याने अ‍ॅडम झॅम्पा आणि संदीप शर्माला तीन षटकार लगावले अन् स्टेडियममध्ये एकाच उत्साह निर्माण झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१७ चेंडूत नाबाद ३२ धावा करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने काल रात्री शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या संघ चेन्नई सुपर किंग्जला विजय मिळवून दिला नाही. चेपॉक स्टेडियमवर घरच्या प्रेक्षकांसमोर राजस्थान रॉयल्सविरुद्ध शेवटच्या षटकात २१ धावांची गरज होती. षटकाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला तरी शेवटच्या चेंडूवर पाच धावा हव्या होत्या. अनुभवी वेगवान गोलंदाज संदीप शर्माने शानदार यॉर्कर टाकला, ज्याला माहीला उत्तर नव्हते. तीन धावांनी झालेल्या पराभवाचे खापर धोनीने मधल्या षटकांमध्ये संथ फलंदाजीवर फोडले.

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थानर रॉयल्स यांच्यातील हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पाहिला गेला. विजयासाठी चेन्नईला १७६ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे धोनीला गाठता आले नाही. शेवटच्या चेंडूवर एमएस धोनी  स्ट्राईकवर होता आणि सीएसकेला विजयासाठी ५ धावा हव्या होत्या. वेगवान गोलंदाज संदी शर्माला शेवटच्या षटकात दोनीने दोन षटकार मारले, पण शेवटच्या चेंडू मात्र त्याला चौकार किंवा षटकार मारता आला नाही. शेवटच्या चेंडू संदीप शर्माने जबरदस्त यॉर्कर टाकला, जो आपल्या हेलिकॉप्टर शॉटसाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीला देखील खेळता आला नाही. असे असले तरी, चाहत्यांना मात्र शेवटपर्यंत धोनीवर विश्वास होता.

धोनीने १८व्या षटकात अ‍ॅडम झॅम्पाला षटकार ठोकून आरआर कॅम्पमध्ये काहीशी घबराट निर्माण करून दिली होती. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीने मोठे फटके मारले त्यावेळी १२ चेंडूत ४० विजयासाठी धावा हव्या होत्या. जेसन होल्डरने १९वे षटक टाकले आणि जडेजाने एक चौकार आणि दोन षटकार मारले. संदीप शर्माने शेवटचे षटक टाकले आणि एमएस धोनीने त्याला दोन षटकार ठोकले. पण त्याने आपला धीर राखून शानदार यॉर्कर टाकले आणि अखेरीस ३ धावांनी राजस्थानला सामना जिंकून दिला. जडेजा २ षटकार आणि १ चौकारासह २५ धावांवर नाबाद राहिला, तर एमएस धोनीने १७ चेंडूत ३ षटकार आणि एक चौकारासह ३२* धावा केल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 chepauk crowd hit 3 big sixes against adam zampa and sandeep sharma on ms dhonis entry avw
Show comments