Ashish Nehra angry on Hardik Pandya: आयपीएल २०२३च्या ६२व्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने सोमवारी सनरायझर्स हैदराबादचा ३४ धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरातचा संघही प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे. मात्र, प्रशिक्षक आशिष नेहरा आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांच्यात मोठा वाद झाला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. हा वाद होण्यामागे अनेक कारणे समोर आली आहेत. एक खेळाडू म्हणून नेहराला अनेकदा चिडताना पहिले आहे, पण २०२२ मध्ये त्याने आयपीएलच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून तो पहिल्यांदाच एवढा रागावलेला दिसत आहे.

वास्तविक, ही घटना गुजरातच्या डावादरम्यान घडली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाला पहिल्याच षटकातच ऋध्दिमान साहा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतल्याने मोठा धक्का बसला. यानंतर शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४७ धावांची भागीदारी केली. मोठ्या भागीदारीला तोडण्यात हैदराबादला यश आले. साई सुदर्शनने ३६ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४७ धावा करून बाद झाला.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

सुदर्शन आऊट होताच गुजरातचा संघ ढेपाळला एकापाठोपाठ एक विकेट्स पडत गेल्या. त्यात हार्दिक पांड्या (८), डेव्हिड मिलर (७), राहुल तेवतिया (३) हे तिन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाले. धावसंख्या १ बाद १४७ वरून ५ बाद १७५ अशी झाली. यानंतर शुबमनने एक बाजू सांभाळून धरत झुंजार शतक झळकावले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. याचं कौतुक करत गुजरातच्या बाकीच्या खेळाडूंनी त्याच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या, पण आशिष नेहराने तिथेच बसून साधा आनंदही व्यक्त केला नाही.

नेहराच्या या वागण्यावर समालोचक आकाश चोप्रा आणि सबा करीम संतापले. या दरम्यान समालोचक असे म्हणत होते की नेहराला त्याच्या संघाकडून यापेक्षा जास्त हवे आहे आणि म्हणून तो शतक साजरे करत नाही. शतक झळकावल्यानंतर शुबमननेही विकेट गमावली. तो ५८ चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०१ धावा करून बाद झाला. गुजरातने ४१ धावांत तब्बल आठ गडी गमावले. यात भुवनेश्वरने शेवटच्या षटकात (२०व्या) ४ गडी बाद केले.

नेहरा आणि हार्दिक यांच्यातील वादाची घटना त्याच वेळी घडली जेव्हा गुजरातच्या फलंदाजाने खराब शॉट खेळून आपली विकेट गमावली. त्यानंतर नेहरा डग आऊटमध्ये चिडलेला दिसला आणि तो सर्व राग त्याने हार्दिक आणि शुबमनवर काढला. डाव संपल्यानंतर नेहराची कर्णधार हार्दिकशी शाब्दिक चकमक झाली आणि डग आऊटमध्ये दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. हार्दिक आणि नेहरा दोघांमध्ये चांगलीच जुंपली होती. नेहरा गेल्यानंतर गुजरात टायटन्सचे संचालक विक्रम सोलंकी हार्दिकला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले. या दोघांमधील वाद त्यांनीच मिटवण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा: IPL 2023: “मन नको मोडूस…”, हरभजन एम.एस. धोनीला असं का म्हणाला? जाणून घ्या

मात्र, सर्व वादानंतरही गुजरातच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत हैदराबादला २० षटकांत ९ बाद १५४ धावांवर रोखले. मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. यश दयालने एक गडी बाद करत त्यांना साथ दिली. या विजयासह गुजरातचे १३ सामन्यांत नऊ विजय आणि चार पराभवांसह १८ गुण झाले आहेत. संघ अजूनही अव्वल स्थानावर असून ते प्ले ऑफसाठी पात्र झाले आहेत. त्याचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे.

Story img Loader