Dhoni Jadeja Controversy, IPL 2023: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आयपीएल २०२३मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. मात्र, आजकाल त्याच्या खेळापेक्षाही तो कर्णधार महेंद्रसिंगसोबतच्या नात्याबद्दल चर्चेत आहे आणि सोशल मीडियावर धोनी आणि जडेजा यांच्यात सर्व काही अलबेल नाही, असे बोलले जात आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या मोसमातील शेवटच्या लीग सामन्यानंतर त्याने एक ट्वीट केल्यामुळे असे म्हटले जात आहे. जडेजाच्या या ट्वीटवर त्याची पत्नी रिवाबानेही प्रतिक्रिया दिली आहे.

धोनी आणि जडेजा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या रिवाबाच्या ट्वीटनंतर चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक जडेजाने एका क्रिप्टिक ट्वीटमध्ये एक कोट शेअर केला होता, ज्यामध्ये “कर्म तुमच्याकडे परत येते” असे लिहिले होते. “आज नाही तर उद्या, पण तुम्ही जसे वागाल तसे फळ तुम्हाला मिळणार हे नक्की.” जडेजाच्या या ट्वीटनंतर त्याच्या पत्नीनेही त्याला पाठिंबा दिला. जडेजाच्या ट्वीटला रिट्विट करत लिहिले, “तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा.” जडेजा आणि धोनीचे काय चालले आहे हे पूर्णपणे स्पष्ट नाही.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
devendra fadnavis sharad pawar
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, महायुतीशी जवळीक वाढतेय? फडणवीस सूचक वक्तव्य करत म्हणाले…

जडेजा कॅमेऱ्यात तणावात दिसत होता

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनी आणि जडेजा यांच्यात दीर्घ संवाद पाहायला मिळाला. यादरम्यान जडेजाही गंभीर मुद्रेत दिसला. जडेजाने ज्या प्रकारचा हावभाव केले त्यावरून दोघांमध्ये काहीतरी वाद सुरू असल्याचं दिसत होतं. गेल्या वर्षीही असेच काहीसे दिसले होते जेव्हा जडेजाने त्याच्या सोशल मीडियावरून सीएसकेशी संबंधित पोस्ट हटवली होती. आयपीएल २०२२मध्ये सीएसकेचे नेतृत्व जडेजाकडे सोपवण्यात आले होते. मात्र, त्याच्या नेतृत्वाखाली संघ सतत पराभूत होत होता, त्यामुळे मोसमाच्या मध्यावर धोनीला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले. यानंतर जडेजाने त्याच्या सोशल मीडियावरून सीएसकेशी संबंधित सर्व पोस्ट काढून टाकल्या, त्यानंतर धोनी आणि त्याच्यामध्ये सर्व काही ठीक नाही, असे सांगण्यात आले.

खरं तर, शनिवारी सीएसकेने दिल्ली कॅपिटल्सचा ७७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून प्लेऑफचे तिकीट जिंकले. या सामन्यात जडेजाची कामगिरी अत्यंत खराब राहिली आणि त्याने चार षटकांच्या गोलंदाजीत ५० हून अधिक धावा खर्च केल्या. धोनी आणि जडेजा यांच्यात या प्रकरणावरून वाद झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.

हेही वाचा: IPL2023: “मुंबई इंडियन्ससाठी शुबमनने खास बॅटिंग केली…” सचिन तेंडुलकरने केले गिलचे कौतुक, त्याच्या कमेंटने आरसीबीचे चाहते झाले अवाक्

आज कोण गाठणार अंतिम फेरी?

आयपीएल २०२३ हळूहळू त्याच्या समारोपाला जात आहे. आजपासून प्लेऑफचे सामने सुरू होत आहेत. अंतिम फेरीसह चार सामने प्लेऑफमध्ये खेळवले जातील. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स हे संघ मंगळवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये आमनेसामने असतील. त्याचवेळी बुधवारी एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. यानंतर शुक्रवारी क्वालिफायर-२ खेळवला जाईल. रविवारी अंतिम सामना होणार आहे. ११ वर्षांनंतर आयपीएलमध्ये प्लेऑफ किंवा शेवटच्या चारमध्ये पोहोचणाऱ्या चारही संघांचे कर्णधार भारतीय आहेत. यापूर्वी २०१२ मध्ये एकदाच असे घडले होते.

Story img Loader