IPL 2023 CSK vs MI Match Updates:आयपीएलच्या १६व्या मोसमातील १२व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. शनिवारी (८ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा सात गडी राखून पराभव केला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने २० षटकांत आठ गडी गमावून १५७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने १८.१ षटकांत तीन विकेट गमावत १५९ धावा करून सामना जिंकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चांगल्या सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सचा डाव गडगडला –

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी ४ षटकांत ३८ धावा जोडल्या, मात्र त्यानंतर आघाडीच्या फलंदाजांनी निराशा केली. इशान किशनशिवाय सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन आणि तिलक वर्मा हे खेळाडू स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, टीम डेव्हिडने २२ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. पण संघाला मोठी धावसंख्या गाठण्यात अपयश आले.

अजिंक्यने झळकावले सर्वात जलद अर्धशतक –

चेन्नई सुपर किंग्जकडून पहिला सामना खेळताना अजिंक्य रहाणेने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. या आयपीएलमधील कोणत्याही फलंदाजाचे हे सर्वात जलद अर्धशतक आहे. अजिंक्यने २७ चेंडूचा सामना करताना ७ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकारांच्या जोरावर ६१ धावांची शानदार खेळी साकारली. त्याचबरोबर ऋतुराजने नाबाद ४० धावा केल्या. तसेच रायडुने नाबाद २० धावा केल्या. शिवम दुबेने २८ धावांचे योगदान दिले.

सीएसकेची उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण –

चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी नेत्रदीपक गोलंदाजी केली. याशिवाय संघाच्या क्षेत्ररक्षकांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केले. चेन्नई सुपर किंग्जकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ बळी घेतले. तर तुषार देशपांडे आणि मिचेल सँटनर यांना २-२ बळी मिळाले. याशिवाय सिसांडा मगालाने १ बळी आपल्या नावावर केला.

मुंबई इंडियन्सचे गोलंदाज विकेट घेण्यात अपयशी ठरले –

मुंबई इंडियन्सला लवकरच पहिले यश मिळाले. जेसन बेहरांडॉफने पहिल्याच षटकातच सलामीवीर ड्वेन कॉनवेला बाद केले, मात्र त्यानंतर अजिंक्य रहाणेने शानदार खेळी केली. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना मधल्या षटकांमध्ये विकेट्स काढता आल्या नाहीत. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला.