आयपीएलचा सध्याचा हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी काही खास राहिला नाही. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्लीला आठ सामन्यांत केवळ दोन विजय मिळाले आहेत. त्यांना सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली पॉइंट टेबलमध्ये तळाच्या म्हणजेच १०व्या स्थानावर आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक हरभजन सिंगने शनिवारी (२९ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दिल्लीच्या पराभवानंतर संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरवर निशाणा साधला.

हरभजन म्हणाला की, “वॉर्नरने ५० चेंडू खेळले असते तर दिल्लीचा संघ ५० धावांनी हरला असता, सर्व चेंडू व्यर्थ गेले असते.” आपल्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये हरभजन म्हणाला, “मला वाटत नाही की दिल्लीचा संघ पुनरागमन करू शकेल आणि संपूर्णपणे जबाबदार कर्णधार वॉर्नर आहे.” त्याने संघाचे नेतृत्व चांगले केले नाही, त्याचा फॉर्म हे एक मोठे कारण होते. हे खूप निराशाजनक आहे. वॉर्नर सनरायझर्सविरुद्ध आधीच बाद झाला होता. यामुळेच दिल्ली विजयाच्या इतकी जवळ आली होती. त्याने ५० चेंडू खेळले असते तर ५० चेंडू वाया गेले असते आणि दिल्लीचा ५० धावांनी पराभव झाला असता.”

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज

हेही वाचा: Rohit Sharma Birthday: काल पार्टी, आज गिफ्ट? राजस्थानविरुद्ध हिटमॅनला विजयाची भेट देण्यासाठी MI पलटण सज्ज

वॉर्नरला आरशात पाहण्याची गरज : हरभजन

या मोसमात हरभजन वॉर्नरच्या स्ट्राईक रेटवर सातत्याने टीका करत आहे. मात्र, या मोसमात वॉर्नर संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आठ सामन्यांमध्ये ३८.५च्या सरासरीने ३०६ धावा केल्या आहेत, परंतु त्याचा स्ट्राइक-रेट फक्त ११८.६० आहे. हरभजन म्हणाला, “आताही जेव्हा तो प्रेझेंटेशनमध्ये येतो तेव्हा तो इतरांच्या चुका दाखवतो, पण तू काय केलेस? तू कोणतीही इच्छाशक्ती दाखवली नाही. तू ३०० पेक्षा जास्त धावा केल्या, पण तुमचा स्ट्राइक रेट पहा. वॉर्नरने खरोखरच त्याच्या फलंदाजीला न्याय दिला नाही. त्याच्या ३०० धावांचा दिल्लीला काही उपयोग नाही. दिल्लीच्या पराभवावर दुसऱ्याला दोष देण्याऐवजी स्वतः ला एकदा वॉर्नरने आरशात पाहण्याची गरज आहे.” अशी सडकून टीका भज्जीने केली.

अक्षर पटेलकडे कर्णधारपद द्यावे

दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेलकडे संघाचे कर्णधारपद देऊन भविष्यासाठी योग्य उदाहरण मांडावे, असेही हरभजन म्हणाला. आयपीएलच्या साखळी टप्प्यातील उर्वरित सामन्यांमध्ये फक्त सहा सामने शिल्लक आहेत आणि दिल्लीला प्लेऑफच्या शर्यतीत टिकायचे असेल तर जवळपास सर्व सामने जिंकावे लागतील.

हेही वाचा: WTC Final: ऑस्ट्रेलिया सावधान! कौंटी क्रिकेट गाजवणारा खेळाडू कांगारूंना पाणी पाजण्यासाठी सज्ज

काय घडलं सामन्यामध्ये?

सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने २० षटकांत ६ बाद १९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ २० षटकांत ६ गडी गमावून १८८ धावाच करू शकला. दिल्लीकडून फिलीप सॉल्ट आणि मिचेल मार्शने सामन्यात अर्धशतक झळकावले. मार्शने ६३ आणि सॉल्टने ५९ धावा केल्या. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. अखेरच्या षटकात अक्षर पटेलने १४ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

Story img Loader