Gujarat Titans beat Delhi Capitals by 6 wicket: आयपीएलच्या १६व्या हंगामातील सातव्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले होते. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ६ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर गुजरात सलग दुसरा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीन गुजरातला १६३ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात गुजरातने १८.१ षटकांत लक्ष्य पूर्ण केले.

१६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, वृध्दिमान साहा आणि शुबमन गिल या जोडीला या सामन्यात चांगली सुरुवात करता आली नाही. २२ धावांवर गुजरातच्या संघाला पहिला धक्का रिद्धिमान साहाच्या रूपाने बसला, जो एनरिक नोरखियाच्या चेंडूवर १४ धावा करून बाद झाला. यानंतर ३६ धावांवर गुजरात संघाला शुबमन गिलच्या रूपाने आणखी एक धक्का बसला, तर ५४ धावांवर संघाने हार्दिक पांड्याची विकेटही गमावली.

India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
Indian Cricket Team Creates History Becomes First Team To Score 5 T20I International Century in 2024 IND vs SA Tilak Varma
IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?

साई सुदर्शनने अर्धशतकी खेळी खेळली, मिलरने आपली किलर स्टाईल दाखवली –

पहिल्या ६ षटकांत ३ महत्त्वपूर्ण विकेट्स गमावल्यानंतर, गुजरात टायटन्स संघाचा डाव साई सुदर्शन आणि विजय शंकर यांनी सांभाळला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५३ धावांची शानदार भागीदारी करून संघाला विजयापर्यंत नेण्याचे काम केले. या सामन्यात २३ चेंडूत २९ धावा करून विजय शंकर पॅव्हेलियनमध्ये परतला.

साई सुदर्शनने या सामन्यात ४८ चेंडूत ६२ धावांची शानदार नाबाद खेळी केली, तर डेव्हिड मिलरने १६चेंडूत ३१ धावांची नाबाद खेळी पाहायला मिळाली. दिल्लीकडून या सामन्यात नॉर्खियाने २ तर मिचेल मार्श आणि खलील अहमद यांनी १-१ विकेट घेतल्या. या मोसमातील गुजरातचा हा सलग दुसरा विजय आहे. गेल्या सामन्यात त्याने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्सचा हा दुसरा पराभव आहे. गेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा – IPL 2023: गुजरात टायटन्सचा मोठा निर्णय; केन विल्यमसनच्या जागी ‘हा’ धडाकेबाज खेळाडू केला करारबद्ध

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ गडी गमावून १६२ धावा केल्या होत्या. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ३२ चेंडूत ३७ तर उपकर्णधार अक्षर पटेलने २२ चेंडूत ३६ धावा केल्या. सरफराज खान ३० आणि अभिषेक पोरेलने २० धावा करून बाद झाले. दिल्ली कपिटल्सचे १० पैकी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. गुजरात टायटन्ससाठी मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी घातक गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. अल्झारी जोसेफला दोन विकेट मिळाल्या.