इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये, चेन्नई सुपर किंग्जचा तिसरा सामना पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी होणार आहे. या हंगामातील दुसरा सामना CSK ने त्याच्या होम ग्राउंड चेपॉकवर खेळला होता ज्यात त्यांनी लखनऊ सुपरजायंट्सचा १२ धावांनी पराभव केला होता. यानंतर सीएसकेचा संपूर्ण संघ तिसऱ्या सामन्यासाठी मुंबईला रवाना झाला. यादरम्यान विमानतळावर संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर याला एक खास काम सोपवण्यात आले होते.
ऑन-कॅमेरा ब्लॉग तयार करणे हे काम होते ज्यामध्ये त्याने त्याच्या सहकारी खेळाडूंची मुलाखत घेतली. दीपक चहरने मुंबईविरुद्धच्या सामन्याबाबत सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांची रणनीती काय असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी तो कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे जाताच त्याच्या इज्जतीचा पार कचराच झाला.
वास्तविक दीपक चहर विमानात धोनीकडे त्याचे मत जाणून घेण्यासाठी गेला होता. यादरम्यान धोनी खूप लक्षपूर्वक पुस्तक वाचण्यात मग्न होता. दीपकला धोनीकडून त्याचे मत जाणून घ्यायचे होताच, त्याने हाताने इशारा करून पुढे जाण्यास सांगितले. यादरम्यान दीपक म्हणाला, ‘माही भाई उत्तर… तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात’. धोनीने दीपक चहरसोबत मस्करी केली असली तरी सीएसकेसाठी त्याने बनवलेला हा व्हिडीओ ब्लॉग आता चाहत्यांना आवडला आहे.
दीपकची कामगिरी कशी आहे
चेन्नई सुपर किंग्जच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक असलेल्या दीपक चहरची कामगिरी काही विशेष झाली नाही. लीगच्या दुसऱ्या सामन्यात लखनऊच्या फलंदाजांनी दीपक चहरला फार धुतले. दीपकने चार षटकात ५५ धावा दिल्या. यादरम्यान त्याने अनियंत्रित गोलंदाजी केली. दीपकने चार षटकांत एकूण पाच वाईड चेंडू टाकले होते. IPL २०२३ मध्ये CSK कर्णधार महेंद्र सिंह धोनी देखील गोलंदाजांनी दिलेल्या अतिरिक्त धावांमुळे खूप नाराज आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये सीएसकेच्या गोलंदाजांनी बरेच नो बॉल आणि वाईड बॉल टाकले आहेत, त्यामुळे संघाला अडचणीचा सामना करावा लागला आहे.
पहिल्या सामन्यात सीएसकेचा पराभव झाला होता
चेन्नई सुपर किंग्सला हंगामातील त्यांच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध ५ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. लखनऊ विरुद्ध संघाने निश्चित पुनरागमन केले असले तरी मुंबईविरुद्धचे आव्हान सीएसकेसाठी सोपे जाणार नाही.
चेन्नई संघ – डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, मिचेल सँटनर, दीपक चहर, आरएस हंगेरगेकर, तुषार देशपांडे, ड्वेन प्रिटोरियस, शुभ्रांशू सेनापती शेख रशीद, अजिंक्य रहाणे, सिसंदा मगाला, निशांत सिंधू, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग, आकाश सिंग, भगत वर्मा.
मुंबई इंडियन्स संघ – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर, अर्शद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, रमनदीप सिंग, शम्स मुलानी, संदीप वॉरियर, विष्णू विनोद, रिले मेरेडिथ, ड्वेन जॉन्सन, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल आणि राघव गोयल.