Australia Squad for WTC Final Ashes 2023: आयपीएल २०२३ नंतर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जून ते ११ जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर हा सामना होणार आहे. या फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघानेही आपला संघ जाहीर केला आहे. ज्या खेळाडूची कसोटी कारकीर्द धोक्यात असल्याचे मानले जात होते अशा खेळाडूचा या संघात समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत या खेळाडूला कसोटी कारकीर्द वाचवण्याची संधी मिळाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जूनमध्ये ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी आणि नवीन टेस्ट चॅम्पियनशिप सायकलच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अॅशेस टेस्ट सीरिजसाठी टीमची घोषणा केली आहे. त्यामुळे तो तयारीसाठी मायदेशी परतणार आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. जर असे खरच निघाले तर मात्र दिल्ली कॅपिटल्स संघासाठी ही खूप धक्कादायक घटना असणार आहे. यामागील कारण म्हणजे आधीच त्यांचे सलग पराभव होत असून ऋषभ पंतच्या अनुपस्थित त्याला कर्णधार करण्यात आले आहे. तो जर गेला तर मग हा संघाल आणखी धक्का बसेल.
निवडकर्त्यांनी या खेळाडूला संधी देऊन करिअर वाचवले!
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३च्या अंतिम सामन्यानंतर इंग्लंडकडून अॅशेस मालिकाही खेळायची आहे. ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम समान आणि अॅशेसच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात डॅशिंग सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा समावेश करण्यात आला आहे. डेव्हिड वॉर्नर गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये धावा काढण्यासाठी झगडत आहे. मात्र निवड समितीने डेव्हिड वॉर्नरवर विश्वास दाखवला आहे.
हे खेळाडू डेव्हिड वॉर्नरसाठी धोका ठरतील
डेव्हिड वॉर्नरशिवाय मॅट रेनशॉ आणि मार्कस हॅरिस यांचाही सलामीवीर म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. डेव्हिड वॉर्नर फ्लॉप झाला तर त्याला संघातून वगळले जाऊ शकते आणि मार्कस हॅरिस किंवा मॅट रेनशॉ यांना सलामीवीर म्हणून प्रयत्न केले जाऊ शकतात. अशा स्थितीत डेव्हिड वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दीसाठी हे सामने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्याच वेळी, डेव्हिड वॉर्नरची आयपीएल २०२३ पूर्वी भारताच्या दौऱ्यावरची कामगिरी निराशाजनक होती जिथे त्याने कोपर फ्रॅक्चरमुळे मायदेशी परतण्यापूर्वी तीन डावात १, १० आणि १५ धावा केल्या.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅबुशेन, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन , मिशेल मार्श, मॅट रेनशॉ आणि टॉड मर्फी.