MS Dhoni Viral Video CSK vs SRH: आयपीएल २०२३च्या २९व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी १३५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी हैदराबादला केवळ १३४ धावांवर रोखूत एमएस धोनीचा निर्णय सार्थ ठरवला. या सामन्यात सीएसकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली पण स्टंपच्या मागे एमएस धोनीनेही आपली जादू दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
स्टंपच्या मागे एमएस धोनीची अफलातून कामगिरी
या सामन्यात धोनीने एक झेल, एक स्टंपआऊट आणि एक रनआउट अशाप्रकारे हैदराबादच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. सर्वप्रथम धोनीने एडन मार्करमचा शानदार झेल टिपला. महेश तिक्षणाच्या चेंडूवर मार्करमच्या बॅटची कड लागली आणि ती एवढी मोठी किनार होती की बॉल खूप फिरला, जर धोनीच्या जागी दुसरा कीपर असता तर त्याने कॅच सोडला असता. मात्र तो एम.एस. धोनी होता त्याने हा झेल सोपा करून मार्करमला तंबूचा रस्ता दाखवला, क्षणभर मार्करमलाही विश्वास बसला नाही की नेमकं काय झालं ते?
यानंतर रवींद्र जडेजाच्या चेंडूवर मयंक अग्रवालला स्टंप करून धोनीने त्याच्या जुन्या रूपाची चाहत्यांना आठवण करून दिली. मयंकने जडेजाच्या चेंडूला पुढे मारण्याचा प्रयत्न केला पण तो चेंडू पूर्णपणे चुकला आणि धोनीने डोळ्याची पापणी लवते न लवते तोच वेल्स विखुरले. यानंतर माहीने हैदराबादच्या डावातील शेवटच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरला धावबाद करून चाहत्यांचा काल आनंदित केला.
एमएस धोनीने रचला इतिहास, हा पराक्रम करणारा पहिला विकेटकीपर ठरला
वास्तविक, सनरायझर्स हैदराबादच्या डावातील १४वे षटक अप्रतिम होते. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हैदराबादचा फलंदाज मयंक अग्रवालने बाद होणे टाळले. यादरम्यान रवींद्र जडेजाची हेन्रिक क्लासेनशी टक्कर झाली आणि त्यामुळे मयंकचा झेल चुकला, पण षटकाच्या पाचव्या चेंडूवर मयंकने पुढे जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न केला पण हुकला आणि धोनीने चेंडू झेलत त्याला यष्टीचीत केले.
मयंकला स्टंपआउट करून धोनीने आयपीएलमध्ये इतिहास रचला. महेंद्रसिंग धोनी आपला २४० वा सामना खेळत असताना, विकेटच्या मागे अप्रतिम स्टंपिंग करताना एका फलंदाजाला २०० वेळा बाद करणारा आयपीएल मधील पहिला यष्टीरक्षक बनला आहे. याशिवाय, टी२० क्रिकेटमध्ये धोनी सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत पहिला यष्टीरक्षक बनला आहे, ज्याने एकूण २०८ झेल पकडले आहेत.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा यष्टिरक्षक
२०८ – एम.एस. धोनी
२०७ – क्विंटन डी कॉक
२०५ – दिनेश कार्तिक</p>
१७२ – कामरान अकमल
१५० – दिनेश रामदिन