महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने नुकतेच आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएल-२०२३ मध्ये मुंबई इंडियन्सने अर्जुनला कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध संधी दिली. यासह सचिन आणि अर्जुन ही आयपीएलमध्ये खेळणारी पहिली पिता-पुत्र जोडी ठरली आहे. अर्जुनच्या पदार्पणानंतर अनेकांनी त्याचे अभिनंदन केले. यामध्ये अर्जुनने ज्या व्यक्तीला पहिल्यांदा चेंडू टाकला होता त्याचा देखील समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात अर्जुनने गोलंदाजीला सुरुवात केली. डावखुऱ्या गोलंदाजाने दोन षटके टाकली ज्यात त्याने १७ धावा दिल्या. जरी अर्जुनला विकेट मिळाली नाही तरी चर्चा मात्र त्याच्या पदार्पणाचीच झाली. या सामन्यात अर्जुनची फलंदाजीही आली नाही. सचिन मुंबई इंडियन्सकडूनही खेळला आहे. त्याने मुंबईचे कर्णधारपदही भूषवले असून सध्या तो मार्गदर्शक म्हणून संघासोबत आहे.

अभिषेक बच्चनच्या ट्विटवर सचिन काय म्हणाला?

अर्जुनच्या पदार्पणानंतर अनेकांनी ट्विट करून सचिन आणि त्याच्या मुलाला शुभेच्छा दिल्या. यामध्ये अर्जुनने पहिल्यांदा गोलंदाजी केलेल्या व्यक्तीचा समावेश होता. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चननेही अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणावर ट्विट करून आनंद व्यक्त केला आणि ही सचिनसाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले. अर्जुन आणि सचिनचे अभिनंदन करताना अभिषेकने लिहिले की, तेंडुलकरला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघात खेळताना पाहणे खूप छान वाटत आहे. यावर सचिनने अभिषेकचे आभार मानले आणि लिहिले की, अभिषेक हा कदाचित पहिला व्यक्ती असेल ज्याच्याकडे अर्जुनने गोलंदाजी केली. हे लोक बिल्डिंगमध्ये क्रिकेट खेळायचे तेव्हाची ही घटना आहे.

हेही वाचा: IPL 2023: धोनीच्या स्टंपिंगवर मोठी कंट्रोव्हर्सी! थर्ड अंपायरनेही लक्ष न दिल्याने सीएसकेला थेट झाला फायदा

दोन वर्षांपासून वाट पाहत आहे

अर्जुन गेल्या दोन हंगामात मुंबई इंडियन्ससोबत होता. २०२१ मध्ये मुंबई त्याच्याशी सामील झाली होती परंतु २०२३ मध्ये त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. अर्जुन हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि नवीन चेंडूवर गोलंदाजी करण्याव्यतिरिक्त तो खालच्या क्रमाने फलंदाजी देखील करतो. अर्जुनच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाला.त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 do you know to whom arjun tendulkar bowl the first ball to sachin himself gave the answer as abhishek bachchan avw