चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. तो लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर ऋतुराजने त्याच्या होणाऱ्या पत्नीबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. त्याचा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे. आता चेन्नई सुपर किंग्सने त्यांना हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत एका बाजूला ऋतुराज, मध्ये धोनी आणि बाजूला त्याची होणारी पत्नी उत्कर्षा बसली आहे. “माझ्या आयुष्यातील दोन व्हीव्हीआयपी. यासाठी मी देवाचा खरंच आभारी आहे”, असे कॅप्शन ऋतुराजने या फोटोला दिले होते.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…
आता त्यावर चेन्नई सुपर किंग्सने प्रतिक्रिया दिली आहे. चेन्नई सुपर किंग्सने इन्स्टाग्रामवर त्या दोघांचा एक गोड फोटो पोस्ट केला आहे. यावेळी ते दोघेही आयपीएलच्या ट्रॉफीबरोबर दिसत आहेत.
आणखी वाचा : एका बाजूला धोनी, तर दुसऱ्या बाजूला उत्कर्षा; ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचा पहिला फोटो समोर, म्हणाला…
“यंदाचे वर्ष फारच छान असून उत्साहाने साजरं करण्याचे आहे”, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. त्यांचा हा फोटोही सर्वांचेच लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यावर अनेकांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आले समोर, जाणून घ्या तिच्याबद्दल…
दरम्यान ऋतुराजने पहिल्यांदाच उत्कर्षाबरोबर जाहीरपणे फोटो पोस्ट केला आहे. ते दोघेही जूनच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल ऋतुराजने अधिकृत माहिती दिलेली नाही.