Ms Dhoni Fans Video Viral On Internet : आयपीएल २०२३ चा फायनलचा सामना रविवारी मुसळधार पाऊस कोसळल्याने रद्द करण्यात आलां. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणरी आयपीएलची फायनल आज सोमवारी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी काल या मैदानात हजेरी लावली होती. यामध्ये पिवळ्या जर्सीत असलेले एम एस धोनीच्या चाहत्यांचा सहभाग जास्त होता. मात्र, पाऊस पडल्याने धोनीला मैदानात खेळताना पाहण्याची चाहत्यांचं स्वप्न रविवारी भंगलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण या चाहत्यांनीही हार मानली नाही. २९ मे रोजी सामना होणार असल्याचं जाहीर होताच धोनीच्या चाहत्यांनी चक्क स्टेशनवर झोपून रात्र काढली. संपूर्ण क्रिडाविश्वात धोनीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सीएसकेचा सामना जिथे असेल, त्या ठिकाणी चाहत्यांचे लोंढेच्या लोंढे धोनीला समर्थन देण्यासाठी पोहोचतात. अशाच एका चाहत्यांच्या ग्रुपचा स्टेशनवर झोपल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – IPL 2023 ची फायनल कोणता संघ जिंकणार? आनंद महिंद्रांनी दिलं भन्नाट उत्तर, ट्वीटरवर म्हणाले, “शुबमनवर विश्वास पण धोनी…”

इथे पाहा व्हिडीओ

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार कर्णधार महेंद्रसिंग धोनी सीएसकेला आयपीएलमध्ये पाचव्यांदा चॅम्पियन बनवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे गुजरात टायटन्सकडे शुबमन गिल नावाची रनमशिन आहे. त्यामुळे या धडाकेबाज फलंदाजाला रोखण्याचं मोठं आव्हान धोनीपुढं असणार आहे. सीएसके आणि गुजरात यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत ४ सामने झाले आहेत. ज्यामध्ये तीन सामन्यांत गुजरातने तर एका सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आहे. आज होणाऱ्या फायनलच्या सामन्यात कोणत्या संघाला विजय मिळवण्यात यश मिळतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 final match of chennai super kings vs gujrat titans stopped due rainfall ms dhoni fans slept on railway station video viral nss