IPL Final 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans: आयपीएलच्या १६व्या हंगामाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. रविवारी (२८ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. जेव्हा दोन्ही संघ या सामन्यात उतरतील तेव्हा अनेक विक्रमही मोडले जातील. या मोसमातील सर्वाधिक धावा करणारा गुजरात टायटन्सचा युवा खेळाडू शुबमन गिल फलंदाजीत विक्रमांचे अनेक टप्पे गाठण्याकडे सज्ज असून त्याकडे तो कसोशीने लक्ष देत आहे.

शुबमन गिलने या मोसमात आतापर्यंत १६ सामन्यात ८५१ धावा केल्या आहेत. त्याने १६ डावात ६०७९च्या सरासरीने आणि १५६.४३च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. शुबमनच्या नावावर तीन शतके आणि चार अर्धशतके आहेत. चेन्नईविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो एका मोसमात ९०० धावा पूर्ण करू शकतो. शुबमनला यासाठी ४९ धावा कराव्या लागतील. जर त्याने हे केले तर विराट कोहलीनंतर एका मोसमात ९०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरेल.

हेही वाचा: IPL 2023: शुबमनच्या प्रशिक्षकाची पृथ्वी शॉवर सडकून टीका, म्हणाला, “पृथ्वीला वाटते की तो स्टार आहे, त्याला कोणी हात…”

विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो

शुबमन गिलला एका मोसमात ९०० धावा पूर्ण करण्याची संधी तर आहेच, शिवाय विराट कोहलीचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे. एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शुबमनच्या नावावर आहे. या प्रकरणात तो कोहलीला मागे टाकू शकतो. कोहलीने २०१६ मध्ये आरसीबीसाठी १६ सामन्यात ९७३ धावा केल्या होत्या. त्याला मागे सोडण्यासाठी शुबमनला १२३ धावा कराव्या लागतील.

एका मोसमात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

फलंदाजसंघहंगामसामनेधावा
विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू२०१६१६९७३
जोस बटलरराजस्थान रॉयल्स२०२२७१८६३
शुबमन गिलगुजरात टायटन्स२०२३१६८५१
डेव्हिड वॉर्नरसनराइजर्स हैदराबाद२०१६१७८४८

या बाबतीत कोहलीची बरोबरी करण्याची संधी

शुबमन गिल जेव्हा चेन्नईविरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा त्याला आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवायला आवडेल. गेल्या चार सामन्यांत त्याने तीन शतके झळकावली आहेत. त्याने सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध शतके झळकावली. केवळ चेन्नईविरुद्धच्या क्वालिफायर-१मध्ये त्याला हे करता आले नाही. शुबमनला ती पोकळी भरून काढायला आवडेल.

हेही वाचा: IPL 2023 Prize Money: विजेता संघ होणार मालामाल! उदयोन्मुख खेळाडूंवरही होणार कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव, जाणून घ्या

शुबमनला या मोसमात चौथे शतक झळकावण्याची संधी असेल. जर त्याने हे केले तर एका मोसमात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत तो विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी करेल. कोहलीने २०१६ मध्ये सर्वाधिक चार शतके झळकावली होती.

Story img Loader