IPL 2023, Graeme Swann Nagin Dance Viral Video: संपूर्ण भारतात सध्या आयपीएलची क्रेझ वाढत आहे. या लीगमध्ये चाहत्यांना एकापेक्षा एक सामने पाहायला मिळत आहेत. आयपीएल मध्ये गुरुवारी ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर केकेआर आणि आरसीबी यांच्यात सामना झाला. या सामन्यात मैदानावर चौकार आणि षटकारांची जोरदार आतिषबाजी पाहायला मिळाली, पण मैदानाबाहेर समालोचन पॅनेलमध्ये इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅम स्वानने आपल्या सहकारी समालोचकांसोबत नागीण डान्स करायला सुरुवात केली, ते एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. स्वानच्या या नागीण डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ग्रॅम स्वानचा नागीण डान्स

इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅम स्वान आयपीएल दरम्यान जिओ सिनेमावर इंग्रजीत समालोचन करत आहे. गुरुवारी केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामन्यादरम्यान स्वान अचानक समालोचकांसोबत नागीण डान्स करताना दिसला. स्वानच्या या नागीण डान्सचा व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले आहेत. आता त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्वानचा हा नागीण डान्स चाहत्यांना खूप आवडतो. यावर लोक खूप मजेदार कमेंटही करत आहेत.

Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Marathi actress Kishori Shahane Dance on varun Dhawan song video goes viral
Video: “लय भारी ताई”, किशोरी शहाणेंचा वरुण धवनच्या गाण्यावर एनर्जेटिक डान्स, नेटकरी करतायत कौतुक
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

यावेळी इंडियन प्रीमियर लीग दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत आहे. हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि ओटीटीवर जिओ सिनेमावर प्रसारित केले जात आहे. अशा परिस्थितीत या दोघांनीही सामन्याच्या प्रक्षेपणासाठी आपापले संघ तयार केले असून त्यामुळे सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतर चाहत्यांचे भरपूर मनोरंजन होत आहे. दोन्ही माजी क्रिकेटपटू जिओ सिनेमाच्या स्टुडिओमध्ये शोच्या अँकरसोबत उपस्थित होते. बॅकग्राउंडमध्ये नागीण डान्स गाणे वाजते, त्यानंतर रीमा मल्होत्रा ​​स्वानला या गाण्यावर स्टेप्स डान्स करायला सांगते. मग स्वानही त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत हा डान्स करते. जिओ सिनेमाने आपल्या ट्विटर हँडलवर हा क्षण शेअर केला आहे.

हेही वाचा: KKR vs RCB: टॉस दरम्यान नेमकं काय झालं? यामुळे नितीश राणा फाफ डु-प्लेसिसवर भडकला, Video व्हायरल

सामन्यात काय घडले?

कोलकाताने पहिल्या ६.१ षटकातच आपल्या ३ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर १२व्या षटकापर्यंत संघाला केवळ ८९ धावांची भर घालता आली होती की करण शर्माने रहमानुल्ला गुरबाज आणि आंद्रे रसेल (०) यांना दोन मोठे धक्के देऊन बाद करून केकेआरला आणखी दबावाखाली ढकलले. अवघ्या ८९ धावांत ५ विकेट्स गमावल्याने केकेआरचा संघ बॅकफूटवर गेला होता. पण इथून शार्दुल ठाकूरने रिंकू सिंगच्या साथीने डाव चांगल्या प्रकारे हाताळला आणि ७ षटकांत १०३ धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या २०४ पर्यंत नेली. यानंतर केकेआरच्या फिरकीपटूंनी आरसीबीला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही आणि सुरुवातीपासूनच दडपणाखाली राहून त्यांनी सामना ८१ धावांनी जिंकला.

Story img Loader