Virender Sehwag on Prithvi Shaw IPL 2023: आयपीएलच्या ६४व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा १५ धावांनी पराभव केला. दिल्लीकडून या सामन्यात पृथ्वी शॉने ३८ चेंडूत ५४ धावा केल्या. संपूर्ण मोसमात खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वीला दिल्लीने आणखी एक संधी दिली. त्याचा फायदा घेत त्याने अर्धशतक ठोकले. पृथ्वीची खेळी पाहून भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला एक मजेशीर प्रसंग आठवला. यासोबतच त्यांनी माजी खेळाडूंचे महत्त्व सांगताना सुनील गावसकरांवर भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकेकाळी भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हटला जाणारा पृथ्वी गेल्या काही काळापासून खराब फॉममधून जात आहे. त्याच्या बॅटमधून मैदानावर धावा निघत नाहीयेत. त्याचवेळी मैदानाबाहेरही तो वेगवेगळ्या वादात अडकलेला दिसला. पृथ्वीने बुधवारी पंजाबविरुद्ध फलंदाजी करताना दाखवून दिले की त्याला भविष्याचा ‘सुपरस्टार’ का म्हटले जाते. पृथ्वीबद्दल बोलताना दिल्लीचा माजी कर्णधार सेहवागने २००३-०४च्या मोसमात सुनील गावसकरसोबत केलेल्या संभाषणाची आठवण करून दिली.

“पृथ्वी आणि शुबमन माझ्याशी क्रिकेटबद्दल कधीच काही बोलले नाहीत”- सेहवाग

एका क्रिकेट शोमध्ये सेहवाग म्हणाला, “पृथ्वी शॉने माझ्यासोबत एक जाहिरात शूट केली. त्यावेळी शुबमन गिलही त्याच्यासोबत होता. त्यांच्यापैकी कोणीही क्रिकेटबद्दल एकदाही बोलले नाही. सहा तास आम्ही तिथे थांबलो. जर तुम्हाला कोणाशी बोलायचे असेल तर तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल. जेव्हा मी संघात नवीन होतो तेव्हा मला सनी भाई (सुनील गावसकर) यांच्याशी बोलायचे होते. मी प्रशिक्षक जॉन राईटला सांगितले की मी अजूनही नवीन खेळाडू आहे आणि मला माहित नाही की सनी भाई मला भेटतील की नाही. तुम्ही त्यांची आणि माझी भेट घडवून द्यायला हवी.”

हेही वाचा: IND vs PAK: भारतासोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी पीसीबी उतावीळ, BCCIने दिले सडेतोड उत्तर म्हणाले, “परदेशातच काय पाकिस्तानात…”

भारताचा माजी विस्फोटक फलंदाज सेहवाग पुढे म्हणाला, “जॉन राइटने २००३-०४ मध्ये माझ्यासाठी डिनरचे आयोजन केले होते आणि मी असेही म्हटले होते की माझा (ओपनिंग) जोडीदार आकाश चोप्रा देखील येईल जेणेकरून आम्ही फलंदाजीबद्दल बोलू शकू. त्यावेळी गावसकर आले आणि त्यांनी आमच्यासोबत जेवण केले. मात्र, त्यांनी क्रिकेटवर एकही शब्द उच्चारला नाही कारण आम्ही यासाठी पुढाकार घ्यावा असे त्यांना वाटत असेल आणि ते साहजिकच होते. जर मी तुम्ही आधी बोलला नाहीत तर गावसकर कधीच माझ्याशी बोलणार नाहीत. ते वरिष्ठ आहेत किंवा नाही यापेक्षा स्वतः कोणीही सल्ला देणार नाहीत. यासाठी आधी आपल्याला बोलावे लागते. सुनील गावसकर सेहवाग किंवा चोप्रा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार नाहीत, त्यांना विनंती करावी लागेल.”

गावसकर यांचा सल्ला सेहवाग आणि चोप्रा यांच्यासाठी कामी आला

सेहवाग वेगवान धावा करण्यासाठी ओळखला जात असे तर आकाश चोप्रा त्याच्या फलंदाजीतील तंत्राविषयी ओळखला जात असे. ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या २००३.-०४ मालिकेत चोप्रा आणि सेहवाग हे पहिल्यांदाच एकमेकांसोबत सलामीला येणार होते. यावर सेहवाग म्हणाला की, “आम्ही त्यानंतर गावसकरांना स्वतः विचारले आणि मग त्यांनी आम्हाला मदत केली.” शॉबद्दल बोलताना सेहवागनेही योग्य निकाल मिळविण्यासाठी मानसिकता मजबूत करण्यावर भर दिला.

हेही वाचा: PBKS vs DC: “सोडलेले झेल अन् मी घेतलेला…”, शिखर धवनच्या एका चुकीने पंजाब किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

पृथ्वी शॉ यांना विनंती करावी

सेहवाग पुढे म्हणाला, “गावसकरांनी त्यांचे इनपुट दिले आणि आम्ही बराच वेळ बोललो. त्या संवादाचा आम्हाला फायदा झाला. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गावसकर कधीच वीरेंद्र सेहवाग किंवा आकाश चोप्रा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत नसत. यासाठी तुम्हाला विनंती करावी लागेल. पृथ्वी शॉने अशी विनंती केल्यास कोणीही त्याला मदत करेल. त्यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसरला विनंती सादर करायला हवी होती. तुम्ही क्रिकेटमध्ये कितीही प्रतिभावान असलात तरीही. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसाल तर काहीच करता येत नाही.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 gavaskar will not come to meet me virender sehwags big statement on prithvi shaw and shubman gill avw