IPL 2023 News: आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्स संघासाठी अचानक एक वाईट बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्स संघाने गुरुवारी खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध ६ गडी राखून रोमहर्षक विजय नोंदवला, मात्र या विजयाच्या जल्लोषात या संघाच्या आनंदाला ग्रहण लागले. आयपीएल २०२३च्या मध्यावर, गुजरात टायटन्स संघासाठी अचानक एक वाईट बातमी समोर आली आहे, ज्यामुळे या संघाच्या चाहत्यांचीही निराशा झाली आहे.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन याने भारतीय फलंदाज शुबमन गिलचे कौतुक करताना म्हटले आहे की, हा फलंदाज पुढील दशकभर जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवेल. गिलने आतापर्यंत कसोटी सामन्यात दोन, एकदिवसीय सामन्यात चार आणि टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतके झळकावली आहेत. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या एका कृत्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.

भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : भाजपा आमदार सुरेश धस हे धनंजय मुंडेंना लक्ष्य का करत आहेत?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…
Pakistan preparations for Champions Trophy slow sport news
चॅम्पियन्स करंडकाची तयारी पाकिस्तानकडून संथगतीने; बहुतेक केंद्रांचे नूतनीकरण अपूर्णच
bjp devendra fadnavis stand on dhananjay munde resignation as minister post
धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद भाजपवर अवलंबून
Nandkumar Ghodele will join Shiv Sena Shinde faction
Nandkumar Ghodele : ठाकरे गटाला मोठा धक्का; छत्रपती संभाजीनगरमधील ‘हा’ नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
Jasprit Bumrah stares down Sam Konstas After Usman Khwaja Wicket and Team India Aggressive Celebration Video viral
IND vs AUS: बुमराहचा जळता कटाक्ष अन् भारताचं आक्रमक सेलिब्रेशन! कॉन्स्टासने वाद घातल्यानंतर ख्वाजाच्या विकेटचा VIDEO व्हायरल
BJP Nitesh Rane kerala mini pakistan statement
नितेश राणे यांच्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढणार ?

गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या झाला निराश

आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत गुजरात टायटन्स संघाचा या मोसमातील हा पहिलाच गुन्हा आहे जो स्लो ओव्हर रेटशी संबंधित आहे आणि त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलचे सामने तीन तास आणि २० मिनिटांत संपवण्याचे उद्दिष्ट आहे, परंतु स्लो ओव्हर-रेट अडचणीचे ठरत आहे, अनेक सामने चार तासांपेक्षा जास्त चालले आहेत. “आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत गुजरात टायटन्स संघाचा हा पहिलाच गुन्हा आहे, त्यामुळे पांड्याला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे,” असे आयपीएल मीडिया अॅडव्हायझरीने शुक्रवारी सांगितले.

हेही वाचा: Hardik Pandya: कर्णधार असूनही हे वागणे शोभत नाही; हार्दिक पांड्याने भर मैदानात असे काही केले की धोनीचे चाहते नाराज, Video व्हायरल

सामन्यात काय झाले?

मोहित शर्माच्या २/१८ आणि शुबमन गिलच्या ४९ चेंडूत ६७ धावांच्या जोरावर गतविजेत्या गुजरात टायटन्सने गुरुवारी पंजाब किंग्जवर सहा गडी राखून विजय मिळवला. पंजाब किंग्जविरुद्धच्या आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आपल्या संघाचे २० षटके निर्धारित वेळेत पूर्ण करू शकला नाही, त्यामुळे हार्दिक पांड्याला स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. हार्दिक पांड्याने दुसऱ्यांदा अशी चूक केली तर इतर खेळाडूंनाही दंड भरावा लागू शकतो.

Story img Loader