आयपीएलच्या १०००व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सचा सहा विकेट्सने पराभव करत या मोसमातील चौथा विजय संपादन केला. या विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने सात गड्यांच्या मोबदल्यात २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने १९.३ षटकांत २१४ धावा करत सामना जिंकला. मुंबईसाठी टीम डेव्हिडने २०व्या षटकातील तीन चेंडूत तीन षटकार मारून सामना संपवला. राजस्थानसाठी यशस्वी जैस्वालची १२४ धावांची खेळी व्यर्थ गेली. त्याचवेळी मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ५५ धावा केल्या. त्यांच्याशिवाय टीम डेव्हिडने ४५ आणि कॅमेरून ग्रीनने ४४ धावा केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलमधील ऐतिहासिक १०००वा सामना मुंबई इंडियन्सने जिंकल्यानंतर रोहित शर्मा चाहत्यांकडून अभिवादन स्वीकारण्यासाठी तो स्टेडियममध्ये त्यांच्याजवळ पोहचला. त्याने आपल्या चाहत्यांनासोबत काही  वेळ गप्पा मारल्या, आटोग्राफ आणि काही सेल्फी देखील काढले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका मजेदार व्हिडिओमध्ये, रोहित शर्मा एका चाहत्याचा फोन सेल्फीसाठी घेतो आणि नंतर तो फोन घेऊन निघून जातो. हे पाहून तो चाहता त्याला आवाज देतो “ अरे रोहित माझा फोन..कुठे घेऊन चाललास फोन माझा प्लीज दे ना…”, असे तो त्याला सांगतो. काही पावले चालल्यानंतर, MI पलटणचा कॅप्टन हसत हसत फोन त्या चाहत्याला परत देतो आणि सांगतो, “अरे मित्रा तुझ्यासोबत प्रँक करत होतो.”

ऐतिहासिक ठरलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने विक्रमी २१३ धावांचा यशस्वी पाठलाग केला. संघाच्या या विजयात आक्रमक फलंदाज टीम डेव्हिडचे मोलाचे योगदान राहिले. त्याने आपल्या तुफानी फलंदाजीने सामना संपवला. ‌‌त्यानंतर आता त्याची तुलना मुंबईचा माजी क्रिकेटपटू कायरन पोलार्ड याच्याशी होऊ लागली आहे.

हेही वाचा: CSK vs PBKS Match: जो जीता वही ‘सिकंदर’! अखेरच्या चेंडूवर चेन्नईचा पराभव, अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्जने मारली बाजी

आयपीएल इतिहासात मुंबईला वानखेडे स्टेडियमवर प्रथमच २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करण्याची संधी होती. सूर्यकुमार यादव याच्या शानदार फलंदाजीने हे आव्हान अवाक्यात आले होते. मात्र, सूर्यकुमार मोक्याचे क्षणी बाद झाल्याने टीम डेव्हिड याच्यावर सामना संपवण्याची जबाबदारी आली होती. त्याने ही जबाबदारी चोख पार पाडली. केवळ १४ चेंडूवर ५ उत्तुंग षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने नाबाद ४५ धावा केल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी १७ धावांची गरज असताना त्याने जेसन होल्डरच्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार ठोकत सामना संपवला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 handed phone to rohit for selfie and took it away hitman pranked fan watch video avw