Chennai Super Kings vs Gujarat Titans Qualifier 1 Match: चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने मंगळवारी आयपीएल २०२३च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला आणि अंतिम तिकीट बुक केले. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली या संघाने १०व्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला. क्वालिफायर सामन्यात धोनीला चिअर करण्यासाठी त्याचा सर्वात मोठा चीअरलीडर पोहोचला. धोनीचा फॅन जो फक्त धोनीचाच नाही तर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचाही आवडता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झिवा ही एम.एस. धोनीची सर्वात मोठी चीअरलीडर आहे

धोनीचा चीअरलीडर दुसरा तिसरा कोणी नसून त्याची मुलगी झिवा धोनी आहे, जी प्रत्येक सामन्यात आपल्या वडिलांना स्टँडवरून चीअर करायला येते. तिची आई, साक्षी सोबत, ती प्रत्येक विकेट साजरी करते आणि जेव्हा जेव्हा ती तिच्या वडिलांना बॅट पाहते तेव्हा टाळ्या वाजवते. आयपीएल १६चा पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला.

या सामन्यानंतर अनेक प्रेमळ, सुंदर असे क्षण पाहायला मिळाले. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा धोनी यांच्यावरील प्रेमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजतो आहे. या सर्व क्षणांचे व्हिडिओ आयपीएलने शेअर केले आहेत, ज्यामध्ये प्रेम, भावना, उत्साह आणि बरेच काही पाहायला मिळाले. व्हिडिओच्या सुरुवातीला महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा दिसत आहेत. यानंतर चेन्नईचे समर्थक महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नईचा संघ दाखवण्यात आला आहे.

व्हिडिओच्या शेवटच्या भागात हार्दिक पांड्या, एम.एस धोनी आणि झिवा धोनीचे सुंदर क्षण दिसत आहेत. व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या पहिल्यांदा धोनीला मिठी मारताना दिसत आहे. यानंतर त्याने धोनीची लाडकी मुलगी झिवा हिला मिठी मारली. त्यानंतर झिवा आणि हार्दिक पांड्या हस्तांदोलन करताना दिसतात आणि शेवटी झिवा धोनीसोबत दिसते. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “प्रेमाचा संगम. उत्साहाचे, आनंदाचे आणि फायनलमध्ये पोहोचल्याची प्रेमळ भावना.”

हेही वाचा: IPL2023: “रिकी पॉंटिंग आणि सौरव गांगुलीने दिल्लीला बुडवले…” भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू गावसकरांचा घणाघात

महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा हिचा जन्म २०१५ मध्ये झाला होता. धोनी त्यावेळी ऑस्ट्रेलियात होता जिथे टीम इंडियाला वर्ल्ड कप खेळत होता. धोनी बराच काळ आपल्या मुलीला भेटू शकला नाही. मात्र, निवृत्तीनंतर तो आपल्या मुलीसोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडत नाहीत. चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये धोनी त्याच्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसत आहे यातून त्यांच्यातील प्रेम स्पष्टपणे दिसत आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 hardik pandyas love for ms dhoni and ziva see how they hugged in the video avw
Show comments