Expensive Players Failed in IPL 2023: आयपीएलच्या १६व्या मोसमात पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादची अवस्था बिकट दिसत आहे. यंदा आयपीएल सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघात अनेक बदल करण्यात आले. त्याने आपल्या संघात अनेक नवीन आणि घातक खेळाडूंचा समावेश केला. आपला कर्णधार केन विल्यमसनला सोडल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एडन मार्करामकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय सनरायझर्स हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाने आयपीएल २०२३ च्या लिलावात एका इंग्लिश खेळाडूचा त्यांच्या संघात समावेश केला होता. हॅरी ब्रूक असे या खेळाडूचे नाव आहे. हॅरी ब्रूकने गेल्या काही महिन्यांत इंग्लंडसाठी चांगली फलंदाजी केली होती. त्याने कसोटी सामन्यांमध्येही टी२० स्ट्राईक रेटने धावा करून सर्वांना प्रभावित केले.
प्राईज टॅगचा दबाव जाणवत आहे?- संजय मांजेरकर
“मी थोडासा मागे जातो, आयपीएल लिलावामध्ये परदेशी खेळाडूंवर नेहमीच जास्त बोली लावली जाते पण ते त्या प्रमाणात तशी कामगिरी करताना मात्र दिसत नाहीत. मला नेहमीच असे वाटत आले आहे की इंग्लिश खेळाडू आयपीएलमध्ये मोठ्या नावलौकिकांसह, उत्तम कामगिरीसह येतात. पण त्यांच्या इथल्या कामगिरीवरून मी नेहमीच साशंक असतो. , मला हे भारतीय परिस्थितीत कसे खेळतात हे पहायचे आहे. आयपीएलचा दबाव विशेषत: किंमत टॅगसह थोडा वेगळा आहे हे मला त्यांच्या खेळावरून वाटते. आणखी काय काय होते या आयपीएलमध्ये? देवच जाणे.. माझ्यासाठी फक्त आता हा विषय म्हणजे पुढे काय होईल त्याची वाट पाहत राहा. फार कमी इंग्लिश खेळाडूंना आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही हे एक प्रकारचे कोडे तयार झाले आहे. बरेच ऑस्ट्रेलियन, आफ्रिकन आणि वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी यावर करत आयपीएलचा फायदा करून घेतला आहे. इंग्लिश खेळाडू आयपीएलचा भाग आहेत परंतु अनेकांनी कोड क्रॅक केला नाही,” संजय मांजरेकर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना आपले मत व्यक्त केले.
१३.२५ कोटी खेळाडूंनी फक्त १६ धावा केल्या
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने या खेळाडूला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी बरेच दिवस बोली लावली होती आणि शेवटी राजस्थानने हार मानली आणि हैदराबादने १३.२५ कोटी रुपये देऊन या खेळाडूला आपल्या संघात समाविष्ट केले. त्यामुळे हैदराबादला या महागड्या खेळाडूकडून खूप अपेक्षा आहेत, पण आतापर्यंत हॅरी ब्रूकची बॅट आयपीएलच्या मोसमात अगदी शांत बसली आहे. हॅरी ब्रूकने आयपीएलच्या चालू हंगामात २ सामने खेळले आहेत. या दोन सामन्यांमध्ये हॅरीने फक्त ८च्या सरासरीने आणि ६४.०० च्या अत्यंत खराब स्ट्राइक रेटने फक्त १६ धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूक अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जगभरातील वेगवेगळ्या टी२० लीगमध्ये चांगली कामगिरी करत होता, परंतु आयपीएलमध्ये येताच त्याचा फॉर्म खराब झाला. अशा परिस्थितीत चाहत्यांनी हॅरी ब्रूकला ट्विटरवर प्रचंड ट्रोल केले.