आयपीएल २०२३ मध्ये सोमवारी आणखी एक रोमांचक सामना खेळला गेला. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी झाला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात लखनऊने एका विकेटने विजय मिळवला. शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर लखनऊचा फलंदाज रवी बिश्नोईला हर्षल पटेलने धावबाद केले पण तरीही तो बचावला. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात रिंकू सिंगने शेवटच्या षटकातील शेवटच्या ५ चेंडूंवर षटकार ठोकून चमत्कार केला. तर पुढच्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघासोबत असा चमत्कार घडला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मॅचमध्ये लखनऊला शेवटच्या षटकात विजयासाठी फक्त ५ धावांची गरज होती. लखनऊला सामना जिंकण्याची संधी होती पण शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या हर्षल पटेलने बंगळुरूसाठी संधी निर्माण केली, पण त्याच्याच चुकीने त्याने ती संधी गमावली.

akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : संतप्त जमावाच्या मारहाणीतून बेस्ट बसचालक संजय मोरेचा जीव ‘या’ माणसामुळे वाचला!
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

क्रीझबाहेर असूनही बिष्णोई का धावबाद झाला नाही?

आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न पडला आहे की जेव्हा पटेलने चेंडू स्टंपवर थ्रो केला आणि बिष्णोईही क्रीझच्या बाहेर होता तरीही तेव्हा तो धावबाद का झाला नाही? हे पूर्णपणे नियमांनुसार होते. MCC च्या नियम ३८.३.१.२ नुसार, क्रिकेटची कायदा बनवणारी संस्था आहे, त्यानुसार जर नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाने क्रीझ सोडली असेल, ती देखील गोलंदाजाने आपली गोलंदाजीची क्रिया पूर्ण केल्यानंतर, म्हणजे गोलंदाजाने रिलीज पॉइंट गाठला असेल तो चेंडू फेकणार त्यावेळी गोलंदाज नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या फलंदाजाला धावबाद करू शकत नाही.

नेमकं काय घडलं?

शेवटच्या चेंडूपूर्वी कर्णधार फॅफ आणि गोलंदाज यांच्यात संभाषण झाले. यानंतर हर्षल गोलंदाजी करायला गेला. बिष्णोई नॉन स्ट्राइकवर होता. अशा स्थितीत हर्षलने हुशारी दाखवत मांकडिंगचा प्रयत्न करत बिश्नोईला बाद करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा प्रयत्न चुकला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने थ्रो करून बिश्नोईला धावबाद करण्याचा प्रयत्न केला, चेंडूही स्टंपला लागला. आऊटचे अपील अंपायरने फेटाळले. पटेलने नो-स्ट्रायकर एंडच्या क्रीजच्या पलीकडे जाऊन आपली कृती पूर्ण केली होती. यानंतर त्याने बिश्नोईला थ्रो मारून म्हणजे मांकडिंग पद्धतीने धावबाद करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊनही अपयशी ठरला. तो नियमात बसणारा नव्हता बिष्णोई बाद होऊनही नाबाद राहिला.

बंगळुरूने सामना गमवला

हा सामना अतिशय रोमांचक होता. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने दोन गडी गमावून २१२ धावा केल्या. त्यासाठी विराट कोहलीने ४४ चेंडूत ६१, कर्णधार डुप्लेसीने ४६ चेंडूत ७९, ग्लेन मॅक्सवेलने २९ चेंडूत नाबाद ५९ धावा केल्या. मात्र, त्याची ही खेळी वाया गेली. लखनऊसाठी निकोलस पूरनने १५ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने १९ चेंडूत ६२ धावा केल्या. मार्कस स्टॉयनिसने ३० चेंडूत ६५ धावांची खेळी केली. आयुष बधोनीने २४ चेंडूत ३० धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज होती. पटेलने आवेश खानलाही मारले होते पण यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने चेंडू नीट पकडला नाही आणि लखनऊने विजयी धाव घेतली आणि सामना एका विकेटने जिंकला.

Story img Loader