अर्जुन तेंडुलकरला दीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएलच्या या मोसमात पदार्पण करण्याची संधी मिळाली. आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत अर्जुन तेंडुलकरने ४ सामन्यात तीन विकेट्स घेतल्या आहेत. कोलकाताविरुद्ध पदार्पण करताना अर्जुन तेंडुलकरने २ षटकात १७ धावा दिल्या. त्यानंतर अर्जुन तेंडुलकरने दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा फॉर्म कायम राखताना शेवटच्या षटकात २० धावा देत बचाव केला.

अर्जुनने भुवनेश्वर कुमारच्या रूपाने आयपीएलची पहिली विकेट घेतली होती. पण पंजाब किंग्जविरुद्ध अर्जुनची गोलंदाजी खूपच वाईट झाली. त्या सामन्यात त्याने तीन षटकात ४८ धावा देत एक विकेट घेतली. त्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात तो पुन्हा लयीत दिसला. अर्जुन तेंडुलकरने दोन षटकांत केवळ ९ धावा देत एक विकेट घेतली. न्यूझीलंडचे क्रिकेट समालोचक सायमन डूल यांनी नुकतेच अर्जुन तेंडुलकरच्या कामगिरीबाबत आश्चर्यकारक वक्तव्य केले आहे.

Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Krunal Pandya in Pushpa 2 Tarak Ponappa looks like Indian Cricketer Know The Truth Behind Viral Photos
Pushpa 2: ‘पुष्पा २’ मध्ये खलनायकाच्या भूमिकेत भारताचा क्रिकेटपटू? व्हायरल फोटोंमागचं काय आहे सत्य?
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल

अर्जुन तेंडुलकर डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करू शकत नाही – सायमन डूल

अर्जुन तेंडुलकरच्या आयपीएलमधील गोलंदाजीच्या कामगिरीबद्दल बोलताना सायमन डूल क्रिकबझशी बोलताना म्हणाला, “तुम्हाला तरुण अर्जुन तेंडुलकरसोबत एक गोष्ट करायची नाही आहे ती म्हणजे एका खराब खेळानंतर त्याला सामन्यातून वगळणे. कारण त्याने खरोखर चांगले गोलंदाजी केली आहे. मला तर अजूनही कळत नाही की रोहितने त्याला शेवटचे षटक का टाकायला दिले? अर्जुन अजून नवीन आहे. डेथ बॉलर तयार होण्यासाठी त्याला अजून वेळ आहे.

हेही वाचा: IPL 2023: झहीर खानच्या फिटनेसवरून विराट कोहलीने घेतली फिरकी, वाढलेल्या पोटावरून हात फिरवल्याचा Video व्हायरल

सायमन डूल पुढे म्हणाला, “शेवटच्या चार-पाच षटकांत गोलंदाजी करावी असा तो परिपूर्ण गोलंदाज झालेला नाही. त्याला पुढे अधिक संधी मिळतील पण ती वेळ अजिबातचं नव्हती. रोहित त्याच्याकडे गेला होता, ज्याची किंमत मुंबईला मोजावी लागली.” माहितीसाठी की, अर्जुन तेंडुलकरने पंजाब किंग्जविरुद्ध डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी केली होती. अर्जुनने टाकलेल्या ओव्हरमध्ये पंजाब किंग्जने ३१ धावा केल्या.

पुढे बोलताना सायमन डूल म्हणाला की, “अर्जुन तेंडुलकर हा दीपक चाहर आणि ट्रेंट बोल्टसारखा गोलंदाज आहे, जो पॉवरप्लेमध्ये दोन ते तीन षटके टाकू शकतो. जिथे चेंडू स्विंग होतो. डावाच्या शेवटी गोलंदाजी करण्यासाठी त्याला सध्या पुरेसा अनुभव नाही. रोहितला माझा सल्ला आहे की अर्जुनची सर्व षटके ही एकाच स्पेलमध्ये पूर्ण करून घ्यावीत.”

हेही वाचा: IPL: आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडा आणि फक्त आमच्यासाठी खेळा; इंग्लंडच्या सहा खेळाडूंना आयपीएल फ्रँचायझीकडून मोठी ऑफर, जाणून घ्या

गुजरातविरुद्धच्या सामन्यात काय झाले?

या सामन्यात अभिनव मनोहर आणि डेव्हिड मिलर यांच्यातील ३५ चेंडूत ७१ धावांची मोठी भागीदारी झाली होती. तसेच नूर अहमद आणि राशिद खान यांच्या दमदार कामगिरीमुळे गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा ५५ धावांनी पराभव केला.सामनावीर मनोहरने २१ चेंडूंत ४२ धावांच्या खेळीत तीन चौकार आणि तीन षटकार ठोकले, तर मिलरने २२ चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. अखेरच्या षटकात राहुल तेवतियाने पाच चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने नाबाद २० धावांचे योगदान दिले.गुजरातकडून सलामीवीर शुबमन गिलनेही ३४ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. या विजयासह गुजरातचा संघ गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्जनंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Story img Loader