IPL 2023, Virat Kohli: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवार, १४ मे रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांचा ६०वा लीग सामना खेळला. या सामन्यात आरसीबीने ११२ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या विजयानंतर आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने आपली अपूर्ण इच्छा व्यक्त केली आणि सांगितले की, “मी गोलंदाजी केली असती तर तो ४० धावांत ऑलआऊट झाला असता.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरसीबी आणि राजस्थान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात १७२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ अवघ्या १०.३ षटकात ५९ धावांत सर्वबाद झाला. राजस्थानची आयपीएलमधील ही दुसरी आणि आयपीएलमधील तिसरी सर्वात कमी धावसंख्या होती. यामुळे प्ले ऑफमध्ये जाण्याचे राजस्थानचा मार्ग आता खूप बिकट झाला आहे.

राजस्थान विरुद्धच्या विजयानंतर आरसीबीच्या ड्रेसिंग रुममध्ये चांगलाच जल्लोष झाला, पण भारताचा स्टार किंग कोहलीच्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. विराटने चेष्टा मस्करीत सांगितले की, “जर मी गोलंदाजी केली असती, तर राजस्थानचा संघ ४० धावांत सर्वबाद झाला असता.” पुढे संघातील अनेक खेळाडू त्यात गप्पा मारताना दिसले. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणाला की, “आमच्या संघाला हे दोन गुण मिळणे खूप गरजेचे होते पण रनरेट मध्ये एवढा बदला होईल हे अपेक्षित नव्हते. सध्या गुणतालिकेत खूप बदल झाले असून अजूनही कोणता संघ प्ले ऑफ साठी पात्र ठरेल हे सांगता येत नाही.”

आरसीबीचे गोलंदाज उत्कृष्ट लयीत दिसले

सामन्यानंतर आरसीबीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विराट कोहली म्हणत होता की, “मी गोलंदाजी केली असती तर तो ४० धावांवर ऑलआऊट झाला असता.” सामन्यात आरसीबीचे गोलंदाज उत्कृष्ट लयीत दिसले. संघासाठी वेगवान गोलंदाज वेन पारनेलने ३ षटकात १० धावा देत ३ बळी घेतले. याशिवाय मायकेल ब्रेसवेल आणि कर्ण शर्माने २-२ विकेट घेतल्या. ब्रेसवेलने ३ षटकांत १६ धावा दिल्या, तर कर्ण शर्माने १.३ षटकांत १९ धावा दिल्या. दुसरीकडे, स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने २ षटकात १० धावा देऊन १ बळी आणि ग्लेन मॅक्सवेलने १ षटकात ३ धावा देऊन १ बळी घेतला.

हेही वाचा: IPL 2023: गुडघ्याला दुखापत, तरीही सोडले नाही CSKची साथ, वयाच्या ४१व्या वर्षी धोनीने सादर केले सर्वोत्तम उदाहरण

आरसीबीला पुन्हा प्लेऑफच्या आशा

राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना जिंकून आरसीबीने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. हा सामना आरसीबीने गमावला असता तर हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असता. या विजयानंतर संघाचे १२ सामन्यांत १२ गुण झाले आहेत. आता उर्वरित दोन्ही सामने जिंकून संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. जर संघ एकही सामना हरला तर तो बाद होईल.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 if virat kohli had bowled rajasthan royals would have been all out for 40 runs avw