Jitesh Sharma Catch to Dismiss Virat Kohli PBKS vs RCB IPL 2023: आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. आरसीबी संघाने पाचपैकी तीन सामने गमावले असून या सामन्यात त्यांना विजयी मार्गावर परतायचे आहे. त्याचवेळी पंजाबचा प्रयत्न चौथा मिळवण्याचा असेल. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने चार गडी गमावून १७४ धावा केल्या.
या सामन्यात किंग कोहलीची बॅट थांबण्याचे नाव घेत नव्हती. त्याला पाहून तो आक्रमक पद्धतीने फलंदाजी करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरल्याचे दिसत होते, मात्र डावाच्या १७व्या षटकात जितेश शर्माने विकेट्सच्या मागे अप्रतिम झेल घेत कोहलीला ५९ धावांवर तंबूत पाठवले. किंग कोहलीचा कॅच आऊटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जितेश शर्माने डावीकडे डायव्हिंग करताना विराट कोहलीचा झेल घेतला
पंजाब किंग्जविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना बंगळूरूने संघाने ४ विकेट्स गमावून १७४ धावा केल्या. फॅफ डुप्लेसी आणि विराट कोहलीने संघाकडून अर्धशतकी खेळी खेळली. या सामन्यात किंग कोहली कर्णधारपदासह शानदार फलंदाजी करताना दिसला. या सामन्यात त्याने ५९ धावांची तुफानी खेळी केली. डावाच्या १७व्या षटकात हरप्रीतने लेगस्टंपवर फुलर चेंडू टाकला आणि यादरम्यान विराट कोहलीने स्वीप करण्याचा प्रयत्न केला, मात्र जितेशने डावीकडे डायव्हिंग करताना अप्रतिम झेल घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
विराट कोहलीने पंजाब किंग्जविरुद्ध इतिहास रचला
या सामन्यात कोहलीने ३० धावा करत इतिहास रचला आहे. माहितीसाठी, किंग कोहली १०० सामन्यांमध्ये ३० किंवा त्याहून अधिक धावा करणारा आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्याशिवाय कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आलेली नाही. यासह विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात एकूण ६०० चौकार पूर्ण केले आहेत.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने निर्धारित २० षटकांत ४ विकेट्स गमावून १७४ धावा केल्या. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांनी आरसीबीसाठी १३७ धावांची शानदार भागीदारी केली. या दोघांनी एकूण ९७ चेंडूंचा सामना केला. मात्र, ही जोडी बाद झाल्यानंतर शेवटी कोणालाही झटपट धावा करता आल्या नाहीत आणि आरसीबीचा संघ २०० धावांचा टप्पा पार करू शकला नाही. शेवटी सॅम करण आणि अर्शदीप सिंग यांनी चांगली गोलंदाजी करत आरसीबीला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.