रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आयपीएल २०२३च्या शेवटच्या साखळी सामन्यात विजयाची नितांत गरज होती. गुजरात टायटन्सविरुद्धच्या विजयाने त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळाले असते, पण तसे झाले नाही. कोहलीच्या शतकानंतरही बंगळुरूचा पराभव झाला. शुबमल गिलच्या शतकाने आरसीबीच्या स्वप्नांवर पाणी फिरले. आतापर्यंत एकदाही त्यांना आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही त्यामुळे यावर्षी बंगळुरूला सुवर्ण संधी होती. पराभवानंतर विराट कोहलीसह संघातील इतर खेळाडूंना अश्रू अनावर झाले. काल सामन्यानंतर बंगळुरूच्या मैदानात भावनांचा पूर आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खुद्द शुबमन गिलने हे अनेकदा सांगितले आहे की तो विराट कोहलीला खेळताना बघून मोठा झाला आहे आणि त्याला आपला आदर्श मानतो. अंडर-१९ विश्वचषकातून परतल्यानंतर गिलने सांगितले होते की, “मला विराट कोहलीप्रमाणे खेळायचे आहे. तो ज्या पद्धतीने दबाव हाताळतो. मलाही तेच करायचे आहे. मग त्याने सांगितले की त्याच्या फावल्या वेळात तो यूट्यूबवर विराट कोहलीची जुनी खेळी पाहतो आणि नंतर नेटमध्ये त्याच्या शॉट्सचा सराव करतो.”आज त्याने त्याच्याच आदर्शाला हरवले.

गिलच्या शतकानंतर कोहली आणि सिराज झाला नाराज

शुबमन गिलने शतक झळकावताच मोहम्मद सिराजच्या चेहऱ्यावर दुःख दिसत होते. संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आणि तो निराश होऊन मैदानावर लोळला. कोहली कसा निराश झाला ते तुम्ही पाहू शकतात. शतक झळकावूनही तो आपल्या संघाला प्लेऑफचे तिकीट मिळवून देऊ शकला नाही. हा सामना जिंकणं किती महत्वाचे होते हे सिराजच्या भावनांवरून स्पष्ट होते. बराच वेळ तो तसाच जमिनीवर पडून राहिला.

पराभवानंतर बंगळुरू आपल्या चाहत्यांचे आभार मानायला विसरला नाही. शोकाकुल झालेल्या खेळाडूंनी स्टेडियममध्ये आलेल्या त्यांच्या हजारो चाहत्यांचे आभार मानले. मागील पराभवांप्रमाणेच याचेही दु:ख आरसीबी आणि त्याच्या चाहत्यांना वर्षानुवर्षे असेल. सिराज आणि कोहलीसाठी ही ट्रॉफी खूप महत्त्वाची होती.

हेही वाचा: Rohit Sharma’s Fan: भर पब्लिकमध्ये चाहत्याने रोहित शर्माला मागितला किस, हिटमॅनची धक्कादायक प्रतिक्रिया, Video व्हायरल

आरसीबीचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडला असला तरी किंग कोहलीने शतक झळकावून इतिहास घडवला. कोहली आता आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे. किंग कोहलीचे आयपीएलमधील हे ७वे शतक होते. गेलने आयपीएलमध्ये ६ शतके झळकावली होती. त्याचवेळी गिलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतकही झळकावले. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोघांनी सलग दोन सामन्यात शतके झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली. सलग दोन सामन्यात शतक झळकावणारा कोहली हा आयपीएलच्या इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला, तर गिल असे करणारा चौथा फलंदाज ठरला. गिलला सामनावीराचा किताब देण्यात आला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 kohli hid his face with a cap when siraj was upset rcb players were shattered like this avw
Show comments