Rinku Singh How Much KKR Pays Per Match: आयपीएल २०२३ मध्ये, ९ एप्रिल रोजी गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना झाला. या सामन्यात केकेआरने गुजरात टायटन्सविरुद्ध रोमहर्षक विजयाची नोंद केली. अखेरच्या षटकात कोलकाताला विजयासाठी २९ धावांची गरज होती. अशक्य वाटणारे हे लक्ष्य रिंकू सिंगने शक्य करून दाखवले. डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या यश दयालच्या चेंडूंवर सलग पाच षटकार ठोकून त्याने संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर रिंकू सिंग हिरो बनला. केकेआरकडून प्रत्येक सामना खेळण्यासाठी त्याला किती मानधन मिळते ते जाणून घेऊया.
रिंकू सिंगला प्रत्येक सामन्यात किती मानधन मिळते?
रिंकू सिंग २०१८ साली कोलकाता नाईट रायडर्सशी जोडली गेली होती. तेव्हापासून तो केकेआरसोबत आहे. फ्रँचायझीने त्याला सलग ६ वर्षे कायम ठेवले. त्यांना आयपीएल २०२३ कमी किंमत मिळाली. पण त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध स्फोटक खेळी खेळून शाहरुख खानचे मन जिंकले. या सामन्यात त्याने २१ चेंडूत १ चौकार आणि ६ षटकारांसह ४८ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. रिंकू सिंगच्या पगाराचा विचार केला तर त्याला प्रति सामन्यासाठी ४.२३ लाख रुपये दिले जातात. याचा अर्थ १४ सामने खेळण्यासाठी त्याला कोलकाता नाईट रायडर्सकडून सुमारे ५६ लाख रुपये दिले जातील. याशिवाय, कामगिरीच्या आधारावर, त्यांना कोणत्याही सामन्यात ६ लाख रुपये मिळू शकतात.
केकेआर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी –
आयपीएल २०२३ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना त्याच्या सलामीच्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. हा सामना पंजाबने डकवर्थ/लुईस नियमाच्या आधारे ७ धावांनी जिंकला. यानंतर केकेआरने जोरदार पुनरागमन करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्सचा पराभव केला. सलग दोन विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता १४ एप्रिल रोजी केकेआरची कोलकातामध्ये सनरायझर्स हैदराबादशी लढत होणार आहे.