Virat Kohli Bowling, IPL 2023: कर्णधार फाफ डुप्लेसिसचा संघ आरसीबीला प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करायचे असल्यास त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. त्याचवेळी, कर्णधार एडन मार्करामचा संघ हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असून हा संघ आता इतर संघांचा खेळ खराब करण्याचे काम करू शकतो.

विराट कोहलीने सजलेली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल २०२३च्या प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी लढत आहे. बंगळुरू १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्याला हैदराबाद आणि गुजरातविरुद्ध आणखी २ सामने खेळायचे आहेत. बंगळुरूला दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. गुरुवारी हैदराबादविरुद्ध बंगळुरू मैदानात उतरणार आहे. हैदराबादला किमान धावसंख्येवर खेचण्याच्या इराद्याने कोहली उतरेल.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Virat Kohli knows he is past his best and that will hurt David Lloyd statement after his poor test form
Virat Kohli : ‘विराट कोहलीचा काळ गेला…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘वयाबरोबर प्रत्येकजण…’
14-year old Ira Jadhav slams 346 in U19 cricket breaks Smriti Mandhanas record against Meghalaya
Ira Jadhav : १५७ चेंडू, ३४६ धावा आणि ४२ चौकार…इरा जाधवने स्मृती मानधनाला मागे टाकत झळकावले विक्रमी त्रिशतक
Who is the Indian Shubham Ranjan who will play in BPL 2025 in Bangladesh
BPL 2025 : मराठमोळा शुभम रांजणे बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये
N Jagadeesan smashed 6 fours off 6 balls against Aman Shekhawat during RAJ vs TN match Vijay Hazare Trophy
N Jagadeesan : ६ चेंडू, ६ चौकार… एन.जगदीशनचा अनोखा विक्रम, VIDEO होतोय व्हायरल

कोहली हैदराबादमध्ये ते काम करण्याची तयारी करत आहे, जे त्याला राजस्थान रॉयल्सविरुद्ध जयपूरमध्ये करता आले नाही. सामन्यापूर्वी कोहलीचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ट्रेनिंग सेशनमध्ये गोलंदाजी करताना दिसत होता. कोहलीने याआधीही काही सामन्यांमध्ये गोलंदाजी केली आहे, परंतु नेट सत्रात त्याच्या गोलंदाजीच्या सरावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले कारण त्याने पॅड घालून गोलंदाजी केली होती.

कोहलीच्या या फोटोसोबतच त्याचे विधानही खूप व्हायरल होऊ लागले, जे त्याने राजस्थानवर बंगळुरूने ११२ धावांनी विजय मिळवल्यानंतर सांगितले होते. वास्तविक बंगळुरू आणि राजस्थान यांच्यातील सामना ५ दिवसांपूर्वी जयपूरमध्ये झाला होता. या सामन्यापूर्वी बंगळुरूचा नेट रनरेट खूपच खराब होता. या विजयासोबतच बंगळुरूची धावगतीही सुधारली आहे. अशा परिस्थितीत आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना ५ गड्यांच्या मोबदल्यात १७१ धावा केल्या होत्या.

हेही वाचा: IPL2023: “मी अजिबात त्याच्यासारखा शांत…”, एम.एस. धोनीला गुरु मानणाऱ्या फाफ डू प्लेसिसचे मोठे विधान

प्रत्युत्तरात बंगळुरूने राजस्थानला ५९ धावांत गुंडाळले. राजस्थानवर मोठ्या विजयानंतर कोहलीने गंमतीने सांगितले की, जर त्याने गोलंदाजी केली असती तर संपूर्ण संघ ४० धावांत ऑलआऊट झाला असता. राजस्थानविरुद्ध कोहलीची फार चांगली फलंदाजी करू शकला नाही. त्याला केवळ १८ धावा करता आल्या. अशा स्थितीत हैदराबादमध्ये त्याचा प्रयत्न बॅटने धावा करण्याचा असेल. कोहलीने १२ सामन्यात ३९.४२च्या सरासरीने ४३८ धावा केल्या आहेत.

Story img Loader