Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Updates: आयपीएल २०२३ मधील २१वा सामना पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनच्या रूपाने मोठा धक्का बसला. शिखर धवन दुखापतीमुळे या सामन्यात संघाचा भाग होऊ शकला नाही. धवनच्या जागी अष्टपैलू सॅम करन पंजाब किंग्जची जबाबदारी सांभाळत होता. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पंजाब किंग्ससमोर १६० धावांचे माफक लक्ष्य ठेवले होते. शेवटच्या षटकापर्यंत झालेल्या रंजक सामन्यात पंजाबने दोन विकेट्सने अफलातून विजय संपादन केला.
धावांचा पाठलाग करताना लखनऊ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर दोघांमधील हा सामना खेळवला जात असल्याने येथील द्विधावस्थेत टाकणारी खेळपट्टी आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा पंजाब फलंदाजी करण्यासाठी आला. १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात सलामीवीर अथर्व तायडे खाते न उघडता तंबूत परतला. तिसऱ्या षटकात ४ धावा काढून प्रभासिमरन बाद झाला. पॉवर-प्लेच्या शेवटच्या चेंडूवर मॅथ्यू शॉर्ट २२ चेंडूत ३४ धावा करून तंबूत परतला. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि एक षटकार लगावला. सिकंदर रझाने एका बाजू सांभाळून धरत झुंजार खेळी फलंदाजी केली, त्याने राहून ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार सॅम करन ६ धावा करून बाद झाला. जितेश शर्मालाही केवळ दोन धावा करता आल्या. सिकंदर रझा १८व्या षटकात ४१ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला. यानंतर शाहरुख खानने १० चेंडूत २३ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
दोलायमान होत असलेल्या सामन्यात सिकंदर ठरला खरा हिरो
आजच्या सामन्यात कधी लखनऊ तर पंजाब असा सामना झुकत होता. पहिल्या सहा षटकात ४३ नंतर ७ ते १५ मध्ये ७० आणि नंतर १६ ते २० मध्ये ५७ धावा करत पंजाबने सामना आपल्या नावावर केला. सिंग इज किंग म्हणत पंजाबच्या सिकंदर रझाने अप्रतिम शतक झळकावले. लखनऊकडून युधवीर सिंग, मार्क वूड आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर कृष्णाप्पा गौतम आणि कृणाल यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले.
तत्पूर्वी, शिखर धवन दुखापतीमुळे आजच्या सामन्यात खेळू शकला नाही त्याच्याऐवजी सॅम करन पंजाब किंग्सचे नेतृत्व करण्यासाठी मैदानावर उतरला. त्याने नाणेफेक जिंकून लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार लोकेश राहुल व कायले मायर्स यांनी आक्रमक सुरूवात करताना ७.४ षटकांत ५३ धावा फलकावर चढवल्या. हरप्रीत ब्रारने पंजाब किंग्सला पहिले यश मिळवून देताना मायर्सची (२९) विकेट घेतली. दीपक हुडा (२) पुन्हा अपयशी ठरला, सिकंदर रझाने त्याला पायचीत केले. लोकेशने या सामन्यात आयपीएलमधील ४००० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने सर्वात कमी १०५ डावांमध्ये या धावा करताना ख्रिस गेलचा ( ११२ डाव) विक्रम मोडला. डेव्हिड वॉर्नर (११४), विराट कोहली (१२८) आणि एबी डिव्हिलियर्स ( १३१) यांचा क्रमांक नंतर येतो. राहुलने ४० चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील पहिले अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून २००० धावाही त्याने पूर्ण केल्या.