Lucknow Super Kings vs Royal Challengers Bangalore, IPL Today Match Updates:आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला. या रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर लखनऊने १ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबी संघाने २ बाद २१२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात एलएसजी संघाने पूरण-स्टोइनिसच्या वादळी खेळीच्या जोरावर ९ गडी गमावून विजय मिळवला.आरसीबीसाठी विराट कोहली, फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतकी खेळी खेळली. तर सिराज आणि पारनेल यांनी ३-३ विकेट घेतल्या.

स्टॉइनिस आणि पूरनने लखनऊला दणदणीत विजय मिळवून दिला –

२१३ धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवातीला खराब फलंदाजी पाहायला मिळाली. संघाने पहिल्याच षटकात १ धावांवर काइल मेयर्सच्या (०) रूपाने पहिली विकेट गमावली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला दीपक हुडाही फार काळ टिकू शकला नाही आणि १० चेंडूत ९ धावा काढून तो वेन पारनेलचा बळी ठरला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टॉइनिसने काही काळ जबाबदारी सांभाळली आणि ३० चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६५ धावांची धडाकेबाज खेळी केली आणि संघाला मजबूत स्थितीत आणले.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
IND vs AUS Boxing Day Test Virat Kohli and Sam Konstas argument video viral
IND vs AUS : विराट आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात झाली धक्काबुक्की! पंचांसह ख्वाजाला करावी लागली मध्यस्थी, पाहा VIDEO
IND vs AUS boxing day test 2024
IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता

चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूत ७६ धावांची भागीदारी –

कर्णधार केएल राहुल आणि मार्क स्टॉइनिस यांनी चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूत ७६ धावांची भागीदारी केली. दोघेही क्रीझवर जास्त वेळ घालवू शकले नाहीत. ११व्या षटकात कर्ण शर्माने स्टोइनिसला तर १२व्या षटकात मोहम्मद सिराजने केएल राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. राहुल २० चेंडूत केवळ १८ धावा करून बाद झाला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विकेटकीपर फलंदाज निकोलस पूरनने संघाला विजयाची आशा निर्माण करुन दिली.

हेही वाचा – IPL 2023 LSG vs RCB: लखनऊने बंगळुरुविरुद्ध १ विकेटने नोंदवला ऐतिहासिक विजय; पूरण-स्टोइनिसने पाडला धावांचा पाऊस

सहाव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी –

पुरणने केवळ १९ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ६३ धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट ३२६.३२ होता. पूरन आणि आयुष बडोनी यांनी मिळून सहाव्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. सिराजने पुरणचा डाव संपुष्टात आणला. यानंतर १९व्या षटकात चांगली फलंदाजी करणाऱ्या आयुष बडोनीने आपली विकेट गमावली. बडोनी २४ चेंडूत ३० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर मार्क वुड (१) आणि जयदेव उनाडकट (९) यांनी विकेट गमावल्या.लखनऊला शेवटच्या चेंडूवर एका धावाची गरज होती आणि ती लेगबायद्वारे मिळाली.

या सामन्यात आरसीबीकडून मिश्र गोलंदाजी पाहायला मिळाली. काही गोलंदाजांनी कमी धावा केल्या, तर काही गोलंदाज अधिक महागडे. मोहम्मद सिराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात २२ धावा देत ३ बळी घेतले. याशिवाय वेन पारनेलने 4 षटकांत ४१ धावा देत ३ बळी घेतले. दुसरीकडे कर्ण शर्माने ३ षटकांत ४८ धावा देत २ बळी घेतले. उर्वरित गोलंदाजांमध्ये हर्षल पटेलने ४ षटकांत ४८ धावा देत १ बळी घेतला.

Story img Loader