लखनऊ : लखनऊ सुपर जायंट्सचा ‘आयपीएल’मध्ये बुधवारी दुपारच्या सत्रात चेन्नई सुपर किंग्जशी सामना होणार आहे. या सामन्यापूर्वीच लखनऊ संघाला कर्णधार केएल राहुलच्या दुखापतीची चिंता आहे.

लखनऊला सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना राहुलच्या मांडीला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. तसेच आव्हानाचा पाठलाग करताना तो ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मात्र, दुखापतीमुळे त्याला धावणे शक्य झाले नाही. त्यामुळे बुधवारी चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी त्याच्या उपलब्धतेबाबत साशंकता आहे. राहुल या सामन्याला मुकल्यास कृणाल पंडय़ा लखनऊ संघाचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Eknath khadse Devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस यांच्याशी केवळ तात्विक मतभेद, एकनाथ खडसे यांची भूमिका मवाळ

लखनऊ आणि चेन्नई या दोनही संघांना गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचा विजयी पुनरागमनाचा प्रयत्न असेल. लखनऊच्या संघाची भिस्त काएल मेयर्स, निकोलस पूरन, मार्कस स्टोइनिस आणि कृणाल या खेळाडूंवर, तर चेन्नईची भिस्त ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉन्वे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांसारख्या खेळाडूंवर असेल.

लखनऊ आणि चेन्नई या दोनही संघांनी आतापर्यंत नऊपैकी पाच सामने जिंकले असून त्यांचे १० गुण आहेत. मात्र, सरस निव्वळ धावगतीमुळे लखनऊचा (०.६३९) संघ गुणतालिकेत तिसऱ्या, तर चेन्नईचा (०.३२९) संघ चौथ्या स्थानावर आहे. 

’ वेळ : दुपारी ३.३० वाजता

Story img Loader