Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad IPL Match Updates: आयपीएल २०२३ मधील २९ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. या सामन्यात सीएसकेचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून एसआरएचला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सीएसकेने प्रथम गोलंदाजी करताना, रवींद्र जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर एसआरएचला २० षटकांत ७ बाद १३४ धावांवर गुंडाळले. चेन्नईकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ गडी बाद केले. त्याचबरोबर सीएसकेला आता विजयासाठी १३५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबादची नवी सलामी जोडी कमाल दाखवू शकली नाही –

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात करण्यासाठी हॅरी ब्रूकसह अभिषेक शर्माला पाठवण्यात आले. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी झाली.१८ च्या वैयक्तिक स्कोअरवर आकाश सिंगने हॅरी ब्रूकला आपला शिकार बनवून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर राहुल त्रिपाठीसह अभिषेक शर्माने पहिल्या ६ षटकात संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही आणि १ गडी गमावून ४५ धावांपर्यंत मजल मारली.

रवींद्र जडेजाने फिरकीची जादू दाखवली –

अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ३० चेंडूत ३६ धावांची भागीदारी पाहायला मिळाली. सनरायझर्स हैदराबादच्या संघाला ७१ धावांवर अभिषेकच्या रूपाने दुसरा धक्का बसला, तो ३४ धावा करून रवींद्र जडेजाच्या बळी ठरला. येथून चेन्नईच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत हैदराबाद संघाला धक्के देण्यास सुरुवात केली.जडेजाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा निम्मा संघ ९५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याबरोबरच राहुल त्रिपाठी आणि मयंक अग्रवाल यांना आपली शिकार बनवले.

हेही वाचा – IPL 2023 PBKS vs RCB: ‘१८ कोटी रुपयांत अनुभव विकत घेता येत नाही…’; वीरेंद्र सेहवागची सॅम करणवर जहरी टीका

शेवटच्या षटकात यान्सन आणि वॉशिंग्टनच्या प्रयत्नाने हैदराबादने १३० च्या पुढे मजल मारली –

११६ धावांपर्यंत ६ विकेट्स गमावलेल्या सनरायझर्स हैदराबादच्या डावाच्या शेवटच्या षटकात थोडी आक्रमकता दाखवली. मार्को यान्सन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी वेगवान धावा करण्याचा प्रयत्न करताना संघाची धावसंख्या १३० च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दोघांमध्ये ७व्या विकेटसाठी १८ धावांची भागीदारी पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्जकडून गोलंदाजीत रवींद्र जडेजाने ३, आकाश सिंग, महेश तिक्ष्णा आणि मथिशा पाथिराना यांनी १-१बळी घेतला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 match no 29 sunrisers hyderabad set a target of 135 runs against chennai super kings vbm
Show comments