IPL 2023 MI vs CSK: आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सचा पुढील सामना ८ एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जसोबत होणार आहे. या सामन्यासाठी चेन्नईचा संघ मुंबईत पोहोचला असून सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सने याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीच्या लढतीत त्याचा आरसीबीविरुद्ध पराभव झाला. या सामन्यात रोहित शर्माची टीम मुंबई इंडियन्सचा या मोसमातील पहिला विजय नोंदवण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, चेन्नई संघाला लखनऊविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही विजयी मालिका सुरू ठेवायची आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंशी संवाद साधताना दिसत होते. यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहेत. महाराष्ट्राने केलेले जंगी स्वागत पाहून माही म्हणजेच धोनी अक्षरशः भारावून गेला.

व्हिडिओच्या सुरुवातीला इशान किशन महेंद्रसिंग धोनीसोबत उभा दिसत आहे, तर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेही खुर्च्यांवर एकत्र बसलेले दिसत आहेत. यादरम्यान सूर्यकुमार यादव आणि रवींद्र जडेजाही हस्तांदोलन करताना दिसले. यासोबतच दोन्ही संघांच्या कोचिंग स्टाफने एकत्र फोटोही क्लिक केला. हा व्हिडिओ शेअर करताना मुंबई इंडियन्सने लिहिले, “तुम्ही मुंबई इंडियन्सच्या घरी आला आहात, तुम्हाला नक्कीच पाहुण्यासारखे आदरातिथ्य केले जाईल.”

या व्हिडिओवर चाहते त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत. ते म्हणतात की, “मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना खूप रोमांचक होणार आहे आणि तो पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. यासोबतच मुंबई इंडियन्स पुढे म्हणते की, “हा धोनी विरुद्ध रोहित सामना आहे आणि ही लढत पाहण्यासारखी असेल.”

खेळपट्टीचा अहवाल

मुंबईतील वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल आहे. इथे चेंडू सहज बॅटवर येतो. फलंदाजांकडे इतका वेळ असतो की ते हा आवडता फटका कुठेही खेळू शकतात. येथे गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही. महागडे ठरू नये म्हणून त्यांना योग्य लाइन लेन्थवर गोलंदाजी करावी लागेल. मुंबईत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा फायदा होईल.

हेही वाचा: IPL 2023: जबरदस्त! मराठमोळ्या शार्दुलच्या खेळीवर शाहरूखची लेक झाली फिदा, म्हणाली की, “मला खूप आनंद…”

दोन्ही संघांची संभाव्य ११

मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग ११: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, कॅमेरॉन ग्रीन, टिळक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, जोफ्रा आर्चर, अर्शद खान

चेन्नई सुपर किंग्जचे संभाव्य खेळणारे ११: एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मिचेल सँटनर, दीपक चहर, राजवर्धन हंगेरगेकर.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 mehman nawaji of chennai super kings in mumbai franchise shared special video avw