IPL 2023 Prize Money: आयपीएल २०२३चा अंतिम सामना आज २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. २००८ मध्ये सुरू झालेली आयपीएल आज जगातील सर्वात मोठ्या क्रीडा लीगमध्ये सामील झाली आहे. पहिल्या सत्रात विजेत्या संघाला बक्षीस म्हणून ४.८ कोटी रुपये मिळाले. आणि अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला २.४ कोटी रुपये मिळाले. आज १५ वर्षांनंतर विजेत्या संघाच्या बक्षीस रकमेत ४ पटीने वाढ झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएलची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. २००८ साली सुरू झालेल्या या लीगच्या प्रेक्षकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. बक्षिसांच्या बाबतीतही या लीगने वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या लीगच्या प्रत्येक मोसमात, फ्रँचायझी मोठ्या रकमेची बोली लावून भारतातून आणि परदेशातील खेळाडूंना खरेदी करतात. त्याच वेळी, हंगाम संपेपर्यंत, विजेत्या संघापासून ते साखळी फेरीत बाहेर पडलेल्या संघापर्यंत, त्यांना कोट्यवधी रुपये बक्षीस म्हणून मिळतात.

या लीगच्या पहिल्या दोन हंगामात विजेत्या संघाला ४.८ कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला २.४ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. गेल्या मोसमातील विजेत्या संघ गुजरात टायटन्सला २० कोटी रुपये मिळाले होते. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सला १३ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.

आयपीएल २०२३मध्ये विजेत्या संघावर कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव होणार आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल २०२३ मध्ये एकूण ४६.५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्यांना प्रत्येकी १५ लाख रुपये आणि स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडूला २० लाख रुपये मिळतील. या हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडूला १२ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

हेही वाचा: IPL 2023 Final: शुबमनच्या फलंदाजीला लगाम घालण्यासाठी CSKचा ‘हा’ गोलंदाज बनणार सर्वात मोठं शस्त्र, एम.एस. धोनीचा काय आहे मास्टर प्लॅन?

स्पोर्ट्सस्टारच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्समध्ये कोणता संघ विजेतेपद मिळवेल, त्याला २० कोटी रुपये मिळतील. त्याचवेळी अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला १३ कोटी रुपये जातील. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सला ७ कोटी रुपये, तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपरजायंट्सला ६.५ कोटी रुपये मिळतील.

कोण बनेल चॅम्पियन?

चौथ्या फेरीतील विजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि गतविजेता गुजरात टायटन्स यांच्यातील विजेतेपदासाठी भिडणार आहे. महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा आयपीएल सामना असल्याचेही मानले जात आहे. अशा स्थितीत चेन्नई त्याला फेअरवेल गिफ्ट देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. दुसरीकडे गुजरातचा दुसरा हंगाम खेळणारा संघही काही कमी नाही. हा संघ सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. तिच्याकडे अनेक मॅचविनर आहेत आणि ती पुन्हा एकदा विजेतेपद जिंकू शकते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 millions will be showered on the winning team valuable and emerging players will also get reward of lakhs avw