MS Dhoni: आयपीएल २०२३ मध्ये महेंद्रसिंग धोनीची जादू अजूनही त्याच्या चाहत्यांना भुरळ पाडते. चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधाराने पुन्हा एकदा आपली बॅटने कमाल दाखवण्यास सुरुवात केली आहे. या मोसमात जेव्हा-जेव्हा धोनी मैदानात उतरला तेव्हा त्याने आपली फलंदाजीतील चमक दाखवली आहे. जरी त्याने कमी चेंडू खेळले असले तरी या अनुभवी खेळाडूने सामन्यात मोठा प्रभाव पाडला आहे. यामुळेच धोनीचा जोश आता आणखी वाढला आहे. असेच काहीसे एका चित्रात दिसले जेव्हा एका वृद्ध महिलेने धोनीला किस केले.

ही वृद्ध महिला दुसरी कोणी नसून धोनीची मोठी फॅन असलेल्या अभिनेत्री आणि भाजप नेते खुशबू सुंदरची सासू होती. धोनीसोबत क्लिक केलेला फोटो खुशबूच्या सासूबाईंना मिळाला आणि तिने माहीच्या गालावर किस केले. खुशबू सुंदरनेही धोनीसोबत फोटो काढले आहेत. धोनीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
loksatta readers feedback
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024
लक्षवेधी लढत : प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई
MS Dhoni impressed by Mumbai Ayush Mhatre
MS Dhoni : मुंबईच्या १७ वर्षीय फलंदाजाने जिंकले माहीचे मन, IPL 2025 च्या लिलावापूर्वी CSK ने दिली ‘ही’ खास ऑफर
Who will be Chief minister if Mahayuti wins
महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे

माही मार रहा है

धोनीने या मोसमात तीन डावात ५८च्या सरासरीने ५८ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही २०० पेक्षा जास्त आहे. आयपीएल २०२३मध्ये धोनी एकदाच बाद झाला आहे. धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध आपली चमकदार कामगिरी केली होती. या खेळाडूने १७ चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या होत्या. जरी तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही पण धोनीने चेन्नईला सामन्यात रोखले. धोनीची फलंदाजी पाहून हा खेळाडू फॉर्ममध्ये असून येत्या सामन्यांमध्ये मोठी खेळी खेळू शकतो हे स्पष्ट होते.

हेही वाचा: IPL 2023: आयपीएलपेक्षाही मोठी लीग बनवण्याच्या तयारीत ‘हा’ मुस्लीम देश, BCCI बदलणार का नियम? जाणून घ्या

पुढचा सामना बेंगळुरूचा आहे

चेन्नईचा संघ आता पुढील सामना १७ एप्रिलला खेळणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. म्हणजे आता धोनी आणि विराटची टीम आमनेसामने असणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर असल्याने हा सामना धमाकेदार होण्याची अपेक्षा आहे. या सामन्यात षटकार आणि चौकारांचा पाऊस पडणार आहे कारण चिन्नास्वामीची विकेट सापडली असून येथे धावांचा पाऊस पडणार हे निश्चित आहे. आता तिथे धोनी काय आश्चर्य करतो हे पाहावे लागेल.