नवी दिल्ली : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात असणारे संघ मंगळवारी आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात दोन्ही संघांतील स्थानिक खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल.

‘आयपीएल’मधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने यंदाच्या हंगामाची निराशाजनक सुरुवात केली आहे. सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुकडून पराभूत झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबईचा संघ कामगिरी उंचावेल अशी अपेक्षा होती. मात्र, चेन्नईविरुद्ध मुंबईने अधिकच निराशा केली. मुंबईचे आघाडीच्या फळीतील फलंदाज आणि गोलंदाज अपयशी ठरले. मात्र, दिल्लीच्या संघालाही अजून लय सापडली नसल्याने या सामन्यात दमदार कामगिरी करून विजयाचे खाते उघडण्याची मुंबईकडे उत्तम संधी आहे.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
India Beat Ireland by 305 Runs and Registers Biggest Margin Victory in Womens ODI Cricket INDW vs IREW
INDW vs IREW: ऐतिहासिक! भारताच्या महिला संघाने नोंदवला इतिहासातील सर्वात मोठा विजय, आयर्लंडचा उडवला धुव्वा
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम

कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतविना खेळणाऱ्या दिल्लीच्या संघाने सुरुवातीचे तीनही सामने गमावले आहेत. पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीचे नेतृत्व करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने (तीन सामन्यांत १५८ धावा) फलंदाजीत छाप पाडली असली, तरी कर्णधार म्हणून त्याला संघाची मोट बांधता आलेली नाही. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळताना मुंबईविरुद्ध अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी वॉर्नरवर दडपण असेल.

मुंबईकडे कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांसारखे, तर दिल्लीकडे पृथ्वी शॉ, सर्फराज खान, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांसारखे गुणवान भारतीय खेळाडू आहेत. परंतु या खेळाडूंना अपेक्षित कामगिरी करता न आल्याचा फटका दोन्ही संघांना बसला आहे. त्यामुळे ज्या संघाचे भारतीय खेळाडू आपली कामगिरी उंचावतील, त्या संघाला या सामन्यात विजयाची अधिक संधी असेल.

* वेळ : सायं. ७.३० वाजता

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओ सिनेमा

सूर्यकुमारच्या कामगिरीची चिंता

मुंबईला सूर्यकुमार यादवच्या कामगिरीची चिंता असेल. सूर्यकुमारला गेल्या काही काळापासून धावांसाठी झगडावे लागले आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार सर्वोत्तम कामगिरी करत असल्याने ‘आयपीएल’मध्ये त्याला सूर गवसेल अशी अपेक्षा होती. परंतु बंगळूरुविरुद्ध १५ धावा, तर चेन्नईविरुद्ध केवळ १ धाव करून तो बाद झाला. त्यामुळे मुंबईला विजयाचे खाते उघडायचे झाल्यास सूर्यकुमारला लय सापडणे गरजेचे आहे.

Story img Loader