MS Dhoni Naveen Ul Haq IPL 2023: लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात एकाना स्टेडियमवर सामना होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने ७ गडी गमावून १२५ धावा केल्या. मात्र यानंतर सामना पुढे जाऊ शकला नाही. सामना संपल्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने खेळाडूंसोबत क्लिक केलेला फोटो पाहायला मिळाला. यावेळी नवीन उल हकही उपस्थित होता. नवीनचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला, त्यानंतर यूजर्सनी विराट कोहलीला ट्रोल करायला सुरुवात केली.
लखनऊने गुरुवारी ट्विटरवर काही फोटो शेअर केले. यामध्ये धोनीसोबत लखनऊचे खेळाडूही दिसत आहेत. नवीन-उल-हकनेही धोनीसोबत फोटो काढले आहेत. हा फोटो पाहून ट्विटर यूजर्सनी विराट कोहलीला ट्रोल करायला सुरुवात केली. खरे तर लखनऊ आणि बंगळुरू यांच्यात झालेल्या शेवटच्या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात वाद झाला होता. कोहली आणि नवीन यांच्यातील वादानंतर गौतम गंभीरसोबत भांडणही झाले होते. नवीनचा धोनीसोबतचा फोटो पाहून चाहत्यांनी लिहिले की, “कोहलीला हा सन्मान कधीच मिळू शकत नाही.” दुसरा यूजर म्हणाला की, “धोनी धोनी आहे त्याच्यासारखा खेळाडू होणे नाही.” आणखी एका यूजरने लिहिले, “माही नेहमी विचार करून खेळतो म्हणून त्याने भारताला एवढे यश मिळवून दिले आहे.”
विशेष म्हणजे बंगळुरूने लखनऊचा १८ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. याआधी नवीन-उल-हकही कोहलीशी भिडला होता. मात्र, सामन्यानंतर हे प्रकरण काही प्रमाणात शांत झाले. यानंतर लखनऊचा सामना चेन्नईशी झाला. मात्र पावसामुळे तो पूर्ण होऊ शकले नाही. लखनऊने १९.२ षटकांत ७ गडी गमावून १२५ धावा केल्या. यादरम्यान आयुष बदोनीने शानदार खेळी केली. त्याने ३३ चेंडूत ५९ धावा केल्या. मात्र, पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही.
चेन्नई आणि लखनऊ यांच्यातील सामन्यापूर्वी राजीव शुक्ला यांनी नवीनची भेट घेतली
लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयपीएल २०२३चा ४५वा सामना लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर पावसामुळे रद्द झाला. मात्र, या सामन्यापूर्वी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकची एकाना स्टेडियमवर भेट घेतली. राजीव नवीनशीही बोलले, ज्याचा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. विराट कोहली आणि नवीन यांच्यातील भांडणानंतर आयपीएलचे माजी अध्यक्ष अफगाणिस्तानच्या खेळाडूला भेटणे हा योगायोग नाही. नवीन आणि विराटच्या भांडणावर राजीव बोलत असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे.