CSK Ban Team: इंडियन प्रीमियर लीग २०२३ दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज संघाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. सीझन १६च्या दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जवर आयपीएलमधून बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पट्टाली मक्कल काची (पीएमके) च्या आमदाराने तामिळनाडू सरकारला संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यामागील कारण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

आयपीएल २०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघावर होणार बंदी?

पट्टाली मक्कल काची (पीएमके) आमदार एसपी वेंकटेश्वरा यांनी तामिळनाडू सरकारकडे चेन्नई सुपर लीग संघावर बंदी घालण्याची मागणी केली. संघात राज्याचा एकही खेळाडू नसल्याने एसपी व्यंकटेश्वर यांनी ही मागणी केली आहे. पीएमकेच्या वरिष्ठ नेत्याने विधानसभेत सांगितले की तामिळनाडूमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत परंतु सीएसके फ्रँचायझीने आपल्या २७ सदस्यांच्या संघात एकही खेळाडू ठेवलेला नाही. ते म्हणाले की, “सीएसके तामिळनाडूचे नाव वापरून मोठ्या प्रमाणात कमाई करत आहे परंतु त्याने तामिळनाडूच्या खेळाडूंना बाजूला केले आहे. PMK तामिळांशी संबंधित मुद्दे मांडण्यासाठी ओळखले जाते आणि वेंकटेश्वरनचे ताजे विधान CSK संघात तामिळनाडूचा एकही खेळाडू नसल्याच्या चिंतेवर आधारित आहे.”

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi Candidate pune, Vanchit Bahujan Aghadi,
“भाजपचा आरक्षण संपविण्याचा मोठा डाव”, कोणी केला हा गंभीर आरोप ?
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
amit shah remark on muslim reservation in ghatkopar
मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे परखड प्रतिपादन
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Assembly Election 2024 Sillod Constituency Challenging Abdul Sattar print politics news
लक्षवेधी लढत: सिल्लोड: सत्तार यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर?
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “दिल्लीत आमचं सरकार आल्यानंतर आरक्षणाची ५० टक्क्यांची भिंत तोडणार”, राहुल गांधींचं मुंबईच्या सभेत मोठं विधान

व्यंकटेश्वरन यांनी मोठे वक्तव्य केले आहे

विधानसभेतून बाहेर पडल्यानंतर पीएमकेचे आमदार व्यंकटेश्वरन म्हणाले, ‘लोकांनी मला सांगितले की येथे अनेक खेळाडू आहेत. तामिळनाडूची राजधानी चेन्नई सुपर किंग्जच्या नावावर आहे. अनेकांनी मला सांगितले की असे नाव असणे आणि एकही खेळाडू नसणे दुर्दैवी आहे. या प्रश्नावर मंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलेले नाही. मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री कारवाई करतील, याची मला खात्री आहे. तामिळनाडूत तमिळ लोकांना महत्त्व दिले नाही तर ते इतरत्र कुठेही सापडणार नाहीत.

चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

ट्वीटरवरील एका यूजरने ट्वीट केले आहे की, “सीएसके बॅन हे काही लॉजिक असू शकत नाही. अशा संकोचित मनोवृत्तीमुळे मलाच लाज वाटत आहे. सगळ्या ठिकाणी असा प्रादेशिक वाद बरा नव्हे. हे डोमेस्टिक क्रिकेट थोडी आहे. आज प्रादेशिक वाद आणला उद्या आयपीएल मध्ये आरक्षण आणाल.” दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे की, “ हे विधान हास्यास्पद असून अनेक खेळाडू असे आहेत जे तामिळनाडूचे आहेत.”