IPL 2023 PBKS vs RR Match Updates: पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पराभव करून आयपीएल २०२३ मध्ये सलग दुसरा विजय मिळवला. गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १९७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ केवळ १९२ धावा करू शकला. त्यामुळे त्यांना पाच धावांनी विजय मिळता आला. या सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) कडून गोलंदाजीत नॅथन एलिसने सर्वाधिक ४ बळी घेतले.

सातत्याने विकेट्स गमावल्यामुळे राजस्थानने सामना गमावला –

या सामन्यात १९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रविचंद्रन अश्विनला राजस्थान रॉयल्सच्या सलामीला यशस्वी जैस्वालसह मैदानात पाठवण्यात आले. यशस्वी जैस्वालने आपल्या डावातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, मात्र त्यानंतर ८ चेंडूत ११ धावा काढून तो अर्शदीपचा बळी ठरला. यानंतर फलंदाजीला आलेल्या जोस बटलरने अश्विनसोबत वेगाने धावा करण्यास सुरुवात केली.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल

राजस्थान संघाला २६ धावांच्या स्कोअरवर दुसरा धक्का अश्विनच्या रूपाने बसला. जो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर बटलर आणि सॅमसनमध्ये तिसऱ्या विकेटसाठी १४ चेंडूत ३१ धावांची भागीदारी झाली. राजस्थानला ५७ धावांवर तिसरा मोठा धक्का जोस बटलरच्या रूपाने बसला, जो १९च्या वैयक्तिक स्कोअरवर नॅथन एलिसचा बळी ठरला.

येथून कर्णधार संजू सॅमसनने देवदत्त पडिकलसह धावसंख्या पुढे नेली, ज्यामध्ये चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये ३४ धावांची भागीदारी पाहायला मिळाली. सॅमसन २५ चेंडूत ४२ धावांची शानदार खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राजस्थान संघाने १२४ धावांपर्यंत आपले ६ महत्त्वाचे गडी गमावले होते.

या सामन्यात शिमरॉन हेटमायरने संघाला विजय मिळवून देण्यासाठी वेगवान धावा करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही १८ चेंडूत ३६ धावांची झटपट खेळी करत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर ध्रुव जुरेल १५ चेंडूत ३२ धावांवर नाबाद राहिला. अशा प्रकारे राजस्थान संघाला या सामन्यात ५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पंजाबकडून नॅथन एलिसने ४ तर अर्शदीप सिंगने २ बळी घेतले.

हेही वाचा – IPL 2023 RR vs PBKS: शिखर धवनमुळे भानुका राजपक्षेला झाली दुखापत; फलंदाजी न करताच सोडावे लागले मैदान

धवन आणि प्रभसिमरनने पंजाबला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले –

या सामन्यातील पंजाब किंग्ज संघाच्या खेळीबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग या जोडीने फलंदाजीत खूप महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामध्ये दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी झाली होती. या सामन्यात प्रभसिमरन सिंगने ३४ चेंडूत ६० धावा केल्या.

या सामन्यात शेवटपर्यंत फलंदाजी करताना कर्णधार शिखर धवनने ५६ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८६ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. पंजाब संघाला २० षटकांत ४ गडी गमावून १९७ धावा करता आल्या. राजस्थानकडून सामन्यात जेसन होल्डर २ तर रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांना १-१ बळी घेता आला.

Story img Loader