BCCI Announces Playoffs & Finals Dates: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २१ एप्रिलच्या संध्याकाळी आयपीएलच्या १६व्या प्लेऑफ आणि अंतिम सामन्यांच्या तारखांबाबत वेळापत्रक जाहीर केले. ज्यामध्ये या मोसमातील पहिला क्वालिफायर सामना २३ मे रोजी आणि एलिमिनेटर सामना २४ मे रोजी चेन्नईच्या मैदानावर, तर दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना २६ आणि २८ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.
या हंगामातील लीग टप्प्यातील सामने २१ मे रोजी संपतील. यानंतर प्लेऑफ टप्प्यातील सामने आयोजित केले जातील. २३ मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार्या पहिल्या क्वालिफायरमध्ये गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये सामना खेळवला जाईल.
यानंतर २४ मे रोजी या मोसमातील एलिमिनेटर सामना पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये चेन्नईच्या मैदानावरच खेळवला जाईल. या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात, पहिल्या क्वालिफायर सामन्यात पराभवाचा सामना करणारा संघ आणि एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ यांच्यात सामना होणार आहे.
आयपीएलच्या १६व्या हंगामाचा अंतिम सामना २८ मे रोजी होणार –
इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामाचा अंतिम सामना २८ मे रोजी होणार आहे. या मोसमातील पहिला सामनाही याच स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे, तर गेल्या मोसमातील अंतिम सामना येथेच झाला होता. या सीझनबद्दल बोलायचे तर यामध्ये एकूण ७० लीग सामने खेळले जाणार आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत एकूण २८ सामने खेळले गेले आहेत. यानंतर प्लेऑफचे सामने आयोजित केले जातील.
१२ मैदानांवर ५२ दिवसांत एकूण ७० सामने खेळवले जात आहेत –
या वेळी ही स्पर्धा अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाला या 12 ठिकाणी खेळवली जात आहे. या १२ मैदानांवर ५२ दिवसांत एकूण ७० सामने खेळवले जात आहेत.
आयपीएल २०२३ प्लेऑफचे वेळापत्रक:
२३ मे – क्वालिफायर एक सामना (चेन्नई)
२४ मे – एलिमिनेटर सामना (चेन्नई)
२६ मे – क्वालिफायर दोन सामना (अहमदाबाद)
२८ मे – अंतिम सामना (अहमदाबाद)