Ravi Shastri IPL 2023: टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मते मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या कामाचा ताण गेल्या काही वर्षांत दुप्पट झाला आहे. तो म्हणाला की, “त्याच्या बॅटमधून धावा निघत नसल्याने रोहितच्या कर्णधारपदावरही परिणाम झाला आहे.” रोहित हा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे, ज्याने मुंबईला पाच विजेतेपद मिळवून दिले (२०२३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये).
गेल्या मोसमात रोहित शर्माची कामगिरी विशेष नव्हती. त्यांचा संघ १४ सामन्यांत केवळ चार विजयांसह क्रमवारीत शेवटच्या स्थानावर राहिला. यावेळीही तीच स्थिती आहे. रोहित शर्माला त्याच्याकडून संघाला, चाहत्यांना, फ्रंचायजीला ज्या अपेक्षा होत्या तशी कामगिरी त्याला करता आली नाही. संघ सध्या १० गुणांसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे.
रोहितच्या धावा होत नाहीत हे त्याच्या फलंदाजीवरून दिसून येत आहेत. त्याचा फॉर्ममध्ये नसल्याचा फटका कर्णधारपदावरही झाल्याचे रवी शास्त्रीचे मत आहे. रवी शास्त्री यांनी ESPNcricinfo ला सांगितले की, “जेव्हा तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये असता, जिथे तुम्ही धावा करत असता, तेव्हा कर्णधार म्हणून काम सोपे होते. मैदानावर तुमची देहबोली सगळं काही सांगत असते, जास्त ऊर्जा घेऊन तुम्ही खेळतात. जेव्हा तुम्ही धावा करत नाही, तेव्हा हे उलट होते.” सलामीवीर म्हणून, रोहितने १० सामन्यात १२६.८९च्या सरासरीने १५४ धावा केल्या आहेत आणि दोनदा खाते न उघडता बाद झाला आहे.
रवी शास्त्री पुढे म्हणाले, “अशा वेळी कर्णधार म्हणून तुमची कामगिरी खेळात दिसणे महत्त्वाचे असते. त्याच्या कारकिर्दीत तो ज्या टप्प्यावर आहे आणि त्याच्याकडे ज्या प्रकारची टीम आहे, त्यामुळे हे सध्या कठीण आहे. हा संघ एकत्र प्रदर्शन केल्यानंतर येत्या काही वर्षांमध्ये उत्कृष्ट ठरू शकते. पण ते योग्य संयोजन मिळवणे हे कर्णधाराचे काम आहे. तुम्ही किती मोठे खेळाडू आहात याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही संघासाठी उपयुक्त आहात की नाही हे जास्त महत्त्वाचे आहे.”
आयपीएल २०२३चा हंगाम मुंबईचा कर्णधार रोहितसाठी चांगला जात नाही कारण त्याने दहा सामन्यांमध्ये १८.३९च्या सरासरीने १८४ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १२६.८९ आहे. त्यात दोनवेळा तो शून्यावर बाद झाला. शास्त्री पुढे म्हणाले, “येथेच कर्णधार म्हणून तुमची कामगिरी समोर येणे महत्त्वाचे आहे. मात्र, रोहितचा हंगाम अद्याप संपलेला नाही. येथूनही तो फॉर्मात आला तर संघ आणि त्याचा मार्ग सुकर होईल. WTCमध्ये भारताला देखील त्याचा फायदा होईल.”