आयपीएल २०२३ खेळले जात आहे. यादरम्यान विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएलमध्ये विराट नेहमीच शानदार फलंदाजी करतो. २०१६ मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये विराटने ९७३ धावा केल्या होत्या. एका मोसमात कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. आयपीएलच्या एका मोसमात आजपर्यंत कोणत्याही फलंदाजाने इतक्या धावा केल्या नाहीत. दरम्यान, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठा दावा केला आहे. आपला हा विक्रम टीम इंडियाचा युवा खेळाडू मोडू शकतो, असे त्याने म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी प्रशिक्षक काय म्हणाले?

गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुबमन गिल इंडियन प्रीमियर लीगच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो, असा विश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. आयपीएलच्या २०१६ च्या मोसमात कोहलीने ८१.०८ च्या सरासरीने आणि १५२च्या स्ट्राईक रेटने ९७३ धावा केल्या. यादरम्यान त्याने चार शतके आणि सात अर्धशतके झळकावली. शास्त्री यांनी प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान सांगितले की गिलकडे कोहलीच्या पुढे जाण्याची क्षमता आहे आणि सलामीवीर असल्याने त्याला धावा करण्याच्या अतिरिक्त संधी मिळतात.

हेही वाचा: WTC Final: द्रविडच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप रणनीतीने ऑस्ट्रेलियाच्या पोटात गोळा, CSKचा ‘हा’ धडाकेबाज खेळाडू टीम इंडियात करणार पुनरागमन

रवी शास्त्री म्हणाले की, “गिल हा सलामीवीर आहे आणि त्यामुळे त्याला धावा करण्याच्या अधिक संधी मिळतील. शास्त्री यांना विश्वास आहे की शुबमन गिल हे काम करेल कारण तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि क्रमवारीत सलामीला फलंदाजी करतो. त्यामुळे त्याला धावा करण्याच्या अधिक संधी मिळतील.” शास्त्री पुढे म्हणाले की, “खेळपट्ट्या चांगल्या आहेत आणि त्यामुळे जर त्याने दोन-तीन डावात ८० ते १०० धावा केल्या तर तोपर्यंत त्याच्याकडे ३०० ते ४०० धावा असतील.”

विक्रम मोडणे कठीण?

रवी शास्त्री पुढे म्हणाले की “माझ्या मते हा विक्रम मोडणे खूप कठीण आहे कारण ९०० धावा ही खूप मोठी संख्या आहे पण एक गोष्ट म्हणजे सलामीवीराला दोन अतिरिक्त सामने आणि दोन अतिरिक्त डाव मिळतील, त्यामुळे जर शक्य असेल तर फक्त सलामीवीरच हा विक्रम मोडू शकतो. जॉस बटलर (८६३ धावा) आणि डेव्हिड वॉर्नर (८४८ धावा) हे कोहलीनंतर एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आहेत. पण या दोन्ही फलंदाजांना ९०० धावांचा आकडाही पार करता आला नाही.”

हेही वाचा: IPL 2023, KL Rahul: अरे हा तर टी२० नव्हे कसोटी खेळाडू! आरसीबी विरुद्धच्या संथ खेळीला नेटकऱ्यांनी केले ट्रोल, तर यावर राहुल म्हणतो…

इरफान म्हणाला, “तिलक वर्मा याने नक्कीच त्याच्यावर खूप प्रभाव टाकला. त्याने गेल्या वर्षी चांगली फलंदाजी केली होती आणि या वर्षीही त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याचा स्वभावही खूप चांगला आहे. भविष्यात तो एक चांगला खेळाडू म्हणून उदयास येईल असे दिसते. दुसरा जुरेल आहे. जुरेल ज्या पद्धतीने फलंदाजी करतो, त्याच्या दडपणाखाली त्याच्या फटक्यांचा दर्जा किती असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. जरी तो अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असले तरीही त्याचा त्याची फलंदाजी पाहून मी भारावलो आहे, भारतीय संघासाठी आणि क्रिकेटसाठी ही आशादायक चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 ravi shastri said shubman gill player can break virat kohlis record of most runs in a season avw