LSG vs MI, Ravichandran Ashwin on Krunal Pandya: आयपीएलच्या ६३व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा ५ धावांनी पराभव केला. या विजयासह त्याचे १३ सामन्यांत १५ गुण झाले आहेत. लखनौकडून झालेल्या सामन्यात मार्कस स्टॉयनिसने नाबाद ८९ धावा केल्या. त्याचवेळी क्रुणाल पांड्याने ४२ चेंडूत ४९ धावा केल्या. त्याला आपले अर्धशतक झळकावता आले नाही आणि रिटायर्ड हर्ट झाला. त्याच्या निवृत्त दुखापतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि काही लोक त्याला ‘बेईमानी’ देखील म्हणत आहेत.

खरं तर, १६व्या षटकाच्या अखेरीस क्रुणालने नाबाद ४९ धावा केल्या होत्या. पुढचे षटक सुरू होण्यापूर्वी दुखापतीमुळे त्याने मैदान सोडले. नियमानुसार फलंदाजाला निवृत्त होण्याची परवानगी आहे. यामध्ये, फलंदाज त्याच्या डावात कधीही स्वत:ला बाद किंवा रिटायर्ड हर्ट घोषित करू शकतो. फलंदाजीदरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या क्रुणालने गोलंदाजीच्या वेळी मैदानात परतत संघाची कमान सांभाळली. त्याने गोलंदाजीही केली. त्याची अवस्था पाहून तो रिटायर्ड हर्ट झाला? की रिटायर्ड आऊट झाला? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?

अश्विनने ट्विट केले आहे

क्रुणालला फलंदाजीदरम्यान मैदानाबाहेर जाताना पाहून भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनही हैराण झाला. त्याने ट्विट करून विचारले, “रिटायर्ड हर्ट?” यावर एका चाहत्याने लिहिले, “ही संघाशी अप्रामाणिकता आहे. त्याने बेईमानी केली.” त्यानंतर अश्विनने त्याला समर्पक उत्तर दिले आणि लिहिले, ”नियम तुम्हाला तसे करण्याची परवानगी देतात. यात अप्रामाणिकपणा, चीटिंग किंवा बेईमानी नाही.” “मात्र मोक्याच्या क्षणी असे करणे योग्य आहे का? जर तुम्ही पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी येतात तेव्हा फिट आहात असेच दिसते.”

रिटायर हर्ट आणि रिटायर आऊट यात काय फरक आहे?

फलंदाजीच्या वेळी एखादा खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर जाऊ शकतो. अशा स्थितीत अंपायर त्याला बाद घोषित करत नाहीत. तो नंतर फलंदाजीला येऊ शकतो. दुसरीकडे, जेव्हा एखादा खेळाडू फलंदाजी करताना दुखापत किंवा आजारी नसतो, तेव्हा तो स्वतःच्या किंवा त्याच्या कर्णधाराच्या विवेकबुद्धीनुसार बाहेर पडतो. अशा स्थितीत तो रिटायर्ड हर्ट समजला जाईल आणि तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकणार नाही.

हेही वाचा: IPL Points Table: मुंबईच्या पराभवाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल! कोहली, धवनचा संघ एमआय पलटणला देणार का धोबीपछाड? जाणून घ्या समीकरण

सामन्यानंतर क्रुणालने दिले स्पष्टीकरण

सामन्यानंतर जेव्हा क्रुणालला याबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मला पायात गोळे येत होते. माझे स्नायू ताणले गेले. हे सर्व शरीरातील पाणी कमी झाल्याने झाले.” या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना १७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ केवळ १७२ धावा करू शकला आणि पाच धावांनी सामना गमावला. लखनऊकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक नाबाद ८९ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार क्रुणाल पांड्याने ४९ धावांची खेळी केली. मुंबईकडून जेसन बेहरेनडॉर्फने दोन गडी बाद केले. मुंबईकडून इशान किशनने ५९ आणि रोहित शर्माने ३७ धावा केल्या. टीम डेव्हिडने नाबाद ३२ धावा केल्या. लखनऊकडून यश ठाकूर आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

Story img Loader