Ravindra Jadeja Upstox Tweet Viral: रवींद्र जडेजाबाबत क्रिकेट चाहत्यांनी ट्वीटरवर ‘कम टू आरसीबी’ हा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. ट्वीटरवर रवींद्र जडेजाबाबत चाहत्यांनी त्याला आरसीबीमध्ये यावे, अशी मागणी केली. चाहत्यांनी ट्वीटरवर कम टू आरसीबी या हॅशटॅगसह जडेजाबद्दल ट्वीट केले आहे. खरे तर काही दिवसांपासून चेन्नईचे चाहते रवींद्र जडेजाला सपोर्ट करत नसल्याच्या बातम्या येत आहेत.

दरम्यान, ‘सर जडेजा’च्या एका ट्वीटने खळबळ उडवून दिली आहे, जे त्याने ‘मोस्ट व्हॅल्युएबल अ‍ॅसेट ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकल्यानंतर केले. त्याचवेळी सर जडेजाच्या धोनीशी झालेल्या भांडणाच्या बातम्याही समोर आल्या, तरीही गुजरातविरुद्धच्या सामन्यात धोनी आणि जडेजा यांच्यात तसं काही दिसले नाही. पण सामना संपल्यानंतर जडेजाने एक ट्वीट केले. त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांचा पाठिंबा न मिळाल्याने ‘सर जडेजा’ खूश नसल्याच्या शक्यतांच्या चर्चांना वेग आला आहे.

Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Virat Kohli Didnt Liked Ambati Rayudu Robin Uthappa Reveals 2019 World Cup Team Selection
Robin Uthappa on Virat Kohli: “विराटला तो आवडत नव्हता”, स्फोटक फलंदाजाला २०१९ च्या वर्ल्डकप संघातून वगळण्याबाबत रॉबिन उथप्पाचा मोठा खुलासा
jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
Arshdeep Singh clean bowled to Ruturaj Gaikwad during MAH vs PUN match in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : अर्शदीपचा अफलातून स्पेल! ऋतुराजचा त्रिफळा उडवत महाराष्ट्राच्या टॉप ऑर्डरला पाडली खिंडार, VIDEO व्हायरल
devendra fadnavis sharad pawar
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, महायुतीशी जवळीक वाढतेय? फडणवीस सूचक वक्तव्य करत म्हणाले…

रवींद्र जडेजासंदर्भात ‘कम टू आरसीबी’ हा हॅशटॅग २४ मे रोजी ट्विटरवर बराच काळ ट्रेंड करत होता. रवींद्र जडेजाबाबत एका यूजरने लिहिले, “त्याला चेन्नईच्या चाहत्यांचा पाठिंबा मिळत नाहीये.” त्याचवेळी दुसऱ्या एका ट्वीटर युजरने तर “RCB मध्ये ये, देवासारखी तुमची पूजा करेन” असेही लिहिले. “कोहलीने CSK संघात सामील व्हावे” दुसर्‍या यूजरने लिहिले “RCB चाहत्यांना जड्डूने त्यांच्या संघात सामील व्हावे असे वाटते, तर चेन्नईचे चाहते म्हणत आहेत की कोहलीला ट्रॉफी जिंकायची असेल तर CSK मध्ये सामील व्हावे.”

अलीकडेच रवींद्र जडेजाच्या धोनीसोबतच्या भांडणाच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याचा काही परिणाम दिसून आला नाही. धोनीसोबतच्या मतभेदाच्या बातम्यांदरम्यान, जडेजाने एक ट्वीट केले होते, ज्यामध्ये त्याने लिहिले होते, “कर्माचे फळ लवकर किंवा उशिरा मिळते.” यावर रवींद्र जडेजाची पत्नी रिबावानेही ट्वीटरवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, “तुझा मार्ग योग्य असून तू त्यावर पुढे जात राहा.” त्यानंतर अनेक प्रकारच्या अफवांचा बाजार तापला.

दुसरीकडे, गुजरातविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर जडेजाला ‘मोस्ट व्हॅल्युएबल अ‍ॅसेट ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. यावर त्यांनी एक ट्वीट केले आणि लिहिले, “अपस्टॉक्सला समजते, परंतु काही चाहत्यांना समजत नाही.” त्याचवेळी, सीएसके आणि गुजरात यांच्यातील सामन्यानंतर, आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन देखील जडेजाला समजावून सांगताना दिसले.

हेही वाचा: IPL 2023: सर्वात मोठी फॅन धोनीची, पण सामन्यानंतर मिठी मारली हार्दिकला! माहीच्या लेकीचा Video व्हायरल!

आयपीएल २०२२मध्ये जडेजाने चेन्नईचे कर्णधारपद स्वीकारले. जिथे चेन्नईने सुरुवातीला ८ पैकी फक्त दोनच सामने जिंकले. अशा स्थितीत जडेजाला कर्णधारपदावरून हटवून मग कर्णधारपद धोनीकडे सोपवण्यात आले. असे असतानाही चेन्नईचा संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. या आयपीएलमध्ये जडेजाने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्याने आयपीएल २०२३च्या १५ सामन्यात १९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आपल्या बॅटने १७५ धावा केल्या आहेत.

Story img Loader