IPL 2023 Playoffs Qualification Scenarios: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांचा आयपीएल २०२३च्या प्लेऑफमधील मार्ग आणखीनच कठीण झाला. आरसीबी हा सुरुवातीपासूनच प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या संघांपैकी एक मानला जात होता, मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये संघाची घसरण झाली. गेल्या चारपैकी तीन सामन्यांमध्ये आरसीबीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल २०२३च्या ५४व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १९९ धावा केल्या. २०० धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ८३ धावा करत संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. या दणदणीत विजयासह मुंबई इंडियन्स आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयपीएल२०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये कसे पोहोचेल?

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खात्यात १० गुण होते. आरसीबीने त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले असते तर त्यांचे १८ गुण झाले असते. मात्र, आता हे शक्य नाही. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अजूनही जास्तीत जास्त १६ गुण मिळवू शकतो. मात्र त्यासाठी आरसीबीला त्यांचे उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. आयपीएल २०२३च्या गुणतालिकेत गुजरात टायटन्स सध्या १६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गुजरातला प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी उर्वरित तीन सामन्यांतून आणखी एका विजयाची गरज आहे.

हेही वाचा: IPL 2023: “DRS ये थोड़ा ज्यादा नहीं हो गया…”, रोहित शर्माची विकेट वादाच्या भोवऱ्यात, माजी खेळाडूंनी ओढले ताशेरे

तीन संघांना १६ गुण मिळू शकतात

चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत ११ सामने खेळले असून त्यांचे १३ गुण आहेत. जर सीएसकेने त्यांचे उर्वरित तीन सामने जिंकले तर त्यांचे १७ गुण होतील, जे त्यांना पहिल्या चारमध्ये नेण्यासाठी पुरेसे असतील. राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जचे देखील १० गुण आहेत परंतु त्यांनी ११ सामने खेळले आहेत त्यामुळे ते जास्तीत जास्त १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतात.

मुंबई इंडियन्सलाही प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते

मुंबई इंडियन्सने त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले तर संघाचे १८ गुण होतील असे मानू या. अशा परिस्थितीत अव्वल ४ मध्ये पोहोचण्यासाठी फक्त एकच स्थान उरले आहे. कारण गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

हेही वाचा: Kohli vs Naveen: जित्याची खोड…, बंगळुरूचा पराभव अन् नवीन उल हकने विराटला पुन्हा डिवचले

चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये लढत आहेत

आयपीएल २०२३च्या प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. जो संघ त्यांच्या उर्वरित सर्व सामने जिंकेल तोच आयपीएल २०२३च्या प्लेऑफसाठी पात्र ठरेल. तसेच, प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे जवळपास स्पष्ट समीकरण या आठवड्याच्या अखेरीस येईल. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स देखील या दरम्यान काही आश्चर्य करू शकतात. जरी त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता कमी असली तरी ते काही संघांसाठी समीकरण खराब करू शकतात.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 rcb can reach the playoffs even after losing to mumbai indians there will be a tough competition with 3 teams know the complete equation avw