Lucknow Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates: लखनऊ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एका विकेटने पराभव करत आयपीएल २०२३ मध्ये तिसरा विजय नोंदवला. या विजयासह हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना लखनौसमोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात लखनऊने नऊ गडी गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यादरम्यान फाफ डु प्लेसिस आणि आवेश खानने चूक केली, ज्यांचा त्यांना फटका बसला आहे.
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) वर एक विकेटने विजय मिळविल्यानंतर आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) ला फटकारण्यात आले आहे. सामना जिंकल्यानंतर एलएसजीच्या आवेश खानने हेल्मेट जमिनीवर फेकून विजयाचा आनंद व्यक्त केला.
फाफ डू प्लेसिसलाही दंड करण्यात आला –
दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसलाही पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर खिसा रिकामा करावा लागला आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात संघाच्या स्लो ओव्हर रेटमुळे (निर्धारित वेळेत सर्व षटके पूर्ण न केल्यामुळे) फाफ डु प्लेसिसला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलने जारी केलेल्या निवेदनानुसार, आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत हा संघाचा हंगामातील पहिला गुन्हा असल्याने कर्णधार फाफ डु प्लेसिसला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आवेश खानकडून आचारसंहितेचा भंग –
लखनऊ सुपर जायंट्स आचारसंहितेच्या स्तर १ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. लखनऊ सुपर जायंट्सच्या आवेश खानला आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. आवेश खानने आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल १ गुन्ह्याचा २.२ भंग केल्याची कबुली दिली आहे. आचारसंहितेच्या लेव्हल १ भंगासाठी मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे.
हेही वाचा – IPL 2023 LSG vs RCB: लाइव्ह सामन्यात घारीने मारली एन्ट्री; काही काळ थांबवावा लागला सामना
प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कर्णधार फाफ डु प्लेसिस, विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलच्या अर्धशतकांच्या जोरावर २ बाद २१२ धावा केल्या. प्रत्युत्तरात निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनिस यांनी लखनऊसाठी संस्मरणीय विजयाचा पाया रचला. संघाने २०षटकांत ९गडी गमावून २१३ धावा करून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले.