रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने लखनऊ सुपर जायंट्सवर १८ धावांनी मिळवलेल्या विजयानंतर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि एलएसजीचा गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. एलएसजी आणि आरसीबी या दोन्ही संघाच्या सदस्यांना हस्तक्षेप करून दोन्ही खेळाडूंना वेगळे करावे लागले होते. दोघांमध्ये लव्ह-हेट रिलेशनशिपचा इतिहास असणारे लखनऊमध्ये सोमवारी (१ मे) रात्री पुन्हा समोर आले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ला कमी धावांच्या IPL २०२३ सामन्यात पराभूत केल्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात भांडण झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरसीबीने १२६ धावांचा यशस्वी बचाव केल्यावर, दोन्ही संघांचे खेळाडू नेहमीच्या हस्तांदोलनात गुंतले होते आणि क्रिकेटपटूंवर कॅमेरे लागलेले असताना कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार वाद झाले. व्हिडिओमध्ये, तुम्ही केएल राहुल, अमित मिश्रा आणि फाफ डू प्लेसिससह प्रत्येकजण दिल्लीत जन्मलेल्या दोन क्रिकेटपटूंना वेगळे करताना पाहू शकता. याआधी या सामन्यात विराट कोहलीने कृणाल पांड्याचा झेल घेत ओठांवर बोट ठेवले होते. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील त्यांच्या मागील स्पर्धेनंतर गौतम गंभीरने बंगळुरूच्या प्रेक्षकांकडे केलेल्या मूक टोमण्याला प्रतिसाद दिला असे प्रत्येकाला वाटले.

कोहली आणि लखनऊ संघाचा मार्गदर्शक गंभीर यांनी काही शब्दांची देवाणघेवाण करताच, LSG कर्णधार केएल राहुल, त्याचा सहकारी अमित मिश्रा आणि विजय दहिया, जो लखनऊच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहे ते समजवायला आले आणि कोहली बोटे फिरवत निघून गेल्याने अंपायर यांनी हस्तक्षेप केला. या घटनेची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाली आणि चाहत्यांनी कमेंट करायला सुरुवात केली. काय झाले ते कळले नाही.

गंभीर आणि कोहली यांच्यात आयपीएल २०१३ मध्ये बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर मैदानावर भिडले होते जेव्हा RCB ने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध सामना केला होता. त्यानंतर, कोहली बाहेर पडला आणि त्याच्या आणि गंभीरमध्ये शब्दांची देवाणघेवाण झाली आणि केकेआरच्या रजत भाटियाला ही जोडी वेगळी करावी लागली.

बंगळुरूने १५ धावांनी सामना जिंकला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपरजायंट्सचा १८ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ९ गडी गमावून १२६ धावा केल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिसने सर्वाधिक ४४ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ १९.५ षटकांत १०८ धावांवर गारद झाला. कृष्णप्पा गौतमने १३ चेंडूत सर्वाधिक २३ धावा केल्या.

हेही वाचा: LSG vs RCB Match: बंगळुरूच्या गोलंदाजांपुढे लखनऊ सुपर जायंट्सचे लोटांगण, आरसीबीचा १८ धावांनी रोमांचक विजय

या पराभवासह लखनऊचा संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्याचे नऊ सामन्यांतून पाच विजय आणि चार पराभवांसह १० गुण आहेत. त्याचवेळी बंगळुरूचेही नऊ सामन्यांत पाच विजय आणि चार पराभवांसह १० गुण आहेत. बंगळुरूचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 rcbs star batsman virat kohli and lsgs gautam gambhir had a heated argument after bengalurus 18 run win over lucknow avw