Anushka Sharma Reaction on Virat Kohli: आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी असून या सामन्यात दोघांनाही विजयी मार्गावर परतायचे आहे. दिल्लीच्या संघाने सलग चार सामने गमावले असून कोणत्याही किंमतीला हा सामना जिंकायचा आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने दिल्लीसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसरीकडे नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीला प्रथम फलंदाजी करावी लागली. असे असले तरी, सलामीला आलेला विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी संघाला वादळी सुरुवात मिळवून दिली. विराटने ५०, तर डू प्लेसिसने २२ धावांची महत्वपूर्ण योगदान दिले. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये २८ चेंडू ४२ धावांची भागीदारी देखील पार पडली. किंग कोहलीने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा स्टँडमध्ये टाळ्या वाजवताना दिसली. अनुष्काची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IPL 2023: एमएस धोनीने जिंकल मनं! ८८ वर्षीय तरुण फॅनचा माहीसोबत फोटो, भाजप नेत्याच्या सासूबाईंची घेतली भेट

अनुष्का शर्मा स्टेडियममध्ये आनंदाने टाळ्या वाजवत होती

खरंतर, विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती किंग कोहलीच्या अर्धशतकानंतर आनंदाने स्विंग करताना दिसली. किंग कोहलीने सुरुवातीपासूनच दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना खूप धुतले, मात्र डावाच्या ११व्या षटकात विराट कोहलीने ललितला पायचीत केले आणि यश धुलने त्याचा झेल घेतला. या चेंडूवर विराट कोहलीने मिड-विकेटच्या दिशेने एक शॉट मारला, मात्र हा चेंडू थेट क्षेत्ररक्षक यशच्या हातात गेला. अशात कोहलीने त्याची विकेट गमावली.

या सीझनमध्ये किंग कोहलीची बॅट सध्या खोऱ्याने धावा काढत आहे. कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या तीनपैकी दोन सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. त्याने पहिल्या सामन्यात ८२ धावा, दुसऱ्या सामन्यात २१ धावा आणि तिसऱ्या सामन्यात ६१ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हे अर्धशतक हे त्याचे या मोसमातील तिसरे अर्धशतक होते. यासोबतच किंग कोहलीने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर २५०० धावा पूर्ण केल्या.

हेही वाचा: IPL 2023: आयपीएलपेक्षाही मोठी लीग बनवण्याच्या तयारीत ‘हा’ मुस्लीम देश, BCCI बदलणार का नियम? जाणून घ्या

आधुनिक युगातील महान फलंदाज म्हणून विराट कोहली याची ओळख आहे. विराटने सोमवारी (१० एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळताना अर्धशतक केले. पण त्याने यासाठी डावाच्या शेवटची खूपच संथ खेळी केली, अशी टीका देखील अनेकांनी केली. याच पार्श्वभूमीवर विराटने टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे. त्याचवेळी आजच्या सामन्यात महिपाल लोमररने २६ आणि ग्लेन मॅक्सवेलने २४ धावा केल्या. शाहबाज अहमदने शेवटी चांगली खेळी केली. दिल्लीकडून मिचेल मार्श आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन बळी घेतले. अक्षर पटेल आणि ललित यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2023 rcbvsdc anushka sharmas cute reaction to king kohli breaking rohit sharmas record flying kiss to virat from the stands avw