Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals Score Updates: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्शने आयपीएलमधून काही दिवस विश्रांती घेतली होती. लग्नासाठी तो परत मायदेशी गेला होता. १० एप्रिल रोजी त्याने त्याची गर्लफ्रेंड ग्रेटा मार्सशी लग्न केले. लग्नाची मेहंदी देखील चुकली नाही आणि ४ दिवसांनंतर तो लीगमध्ये भाग घेण्यासाठी भारतात परत आला. त्यांचा संघ दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी खेळत आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्याच षटकात मार्शची विकेट

विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने आरसीबीला दमदार सुरुवात करून दिली. ४ षटकांनंतर संघाची धावसंख्या ३३ धावा अशी होती. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने चौथे षटक मार्शला दिले. कोहलीने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला आणि डु प्लेसिसने तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. मात्र चौथ्या चेंडूवर मार्शने जबरदस्त पुनरागमन केले. त्याने आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला पॅव्हेलियनमध्ये पाठवून आपल्या संघाला पहिले यश मिळवून दिले.

Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
india vs south africa 3rd t20I match india eye batting revival against sa at centurion
भारतीय फलंदाजांकडे लक्ष; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा ट्वेन्टी२० सामना आज; सूर्यकुमार, पंड्याकडून अपेक्षा
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

फाफ डू प्लेसिसने चेंडू खेचला आणि अमान खानने शॉर्ट मिड-विकेटवर उत्कृष्ट झेल घेतला. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अमनपासून चेंडू खूप दूर होता. पण त्याने हवेत उडी मारून एका हाताने पकडण्याचा प्रयत्न केला. चेंडू हातात आल्यानंतर स्प्लॅटर झाला पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने तो पकडला. आरसीबीच्या कर्णधाराचाही या झेलवर विश्वास बसला नव्हता आणि तो अचंबित होऊन आकाशाकडे पाहू लागला. त्याचवेळी मिचेल मार्शने जल्लोष करत विकेटचा आनंद साजरा केला.

पुढच्या चेंडूवरही विकेट घेता आली असती

मिचेल मार्शला लागोपाठ दोन चेंडूंत दोन बळी मिळू शकले असते. पण मनीष पांडेसारख्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाने झेल सोडला. फॅफ बाद झाल्यानंतर महिपाल लामरोर फलंदाजीसाठी उतरला. तो चेंडू कट करतो आणि तो थेट पॉइंटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मनीष पांडेच्या हातात जातो. अशाप्रकारे मिचेल मार्शचे सलग दोन चेंडूंत दोन अफलातून विकेट्स घेतले मात्र हॅटट्रिकपासून तो वंचित राहिला. पण त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये त्याने महिपाल लामरोरची विकेटही घेतली.

हेही वाचा: IPL 2023, RCBvsDC: रोहित शर्माचा विक्रम मोडत किंग कोहलीवर अनुष्का शर्माची गोंडस प्रतिक्रिया, स्टँडमधून दिला ‘विराट’ला Flying Kiss

दिल्लीसमोर विजयासाठी १७५ धावांचे आव्हान

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्ससमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. बंगळुरूकडून विराट कोहलीने सर्वाधिक ५० धावा केल्या. त्याचवेळी महिपाल लोमररने २६ आणि ग्लेन मॅक्सवेलने २४ धावा केल्या. शाहबाज अहमदने शेवटी चांगली खेळी केली. दिल्लीकडून मिचेल मार्श आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. अक्षर पटेल आणि ललित यादव यांना प्रत्येकी एक विकेट घेत त्यांना साथ दिली.