Ricky Ponting’s son met Virat Kohli: आयपीएलचा १६वा हंगाम सुरू होऊन तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. रोज एकापेक्षा एक दमदार सामने होत आहेत. शेवटचे काही सामने अखेरच्या षटकापर्यंत गेले. लखनऊ सुपर जायंट्सने शेवटच्या चेंडूवर आरसीबीचा पराभव केला. आरसीबीचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांनी तयारी सुरू केली आहे.
ऑस्ट्रेलियन महान रिकी पाँटिंग दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचे प्रशिक्षक आहेत. अलीकडेच, सामन्यापूर्वी पाँटिंगने आरसीबी आणि भारताचा स्टार विराट कोहलीची भेट घेतली. त्यांच्या भेटीदरम्यान आणखी एक खास व्यक्तीही तिथे उपस्थित होती. पाँटिंगसोबत त्याचा मुलगा फ्लेचर विल्यम पॉन्टिंगही हजर होता. याच भेटीत एक सुंदर घटना घडली. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता, ज्यामध्ये पाँटिंगचा मुलगा स्पष्टपणे कोहलीला थोडासा घाबरत होता आणि त्याला भेटण्यास लाजत होता. कॅपिटल्सने व्हिडिओला कॅप्शन दिले आहे, ‘जब रिकी मेट कोहली, एक्स्टेंडेड कॅमिओ: ज्युनियर रिकी.’
ज्युनियर पाँटिंग चक्क लाजताना दिसला
विराट कोहलीसोबतच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये रिकी पाँटिंग आणि ज्युनियर पाँटिंग विराट कोहलीशी बोलताना दिसत आहेत. ज्युनियर पाँटिंग विराट कोहलीकडे पाहून इतका प्रभावित झाला की तो विराटकडे पाहतच राहिला. पाँटिंगने हँडशेक मागितला, पण ज्युनियर पाँटिंग लाजताना दिसला.
कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये
आयपीएल २०२३ मध्ये किंग कोहलीची बॅट तळपत आहे. आतापर्यत तो आपल्या संघ रॉयल्स चॅलेंजर्स बंगलोरसाठी तीन सामने खेळला आहे. दरम्यान, त्याच्या बॅटमधून तीन डावात ८२.०० च्या सरासरीने १६४ धावा झाल्या आहेत. कोहलीने या हंगामात दोन अर्धशतके झळकावली आहेत. चालू हंगामात त्याचा स्ट्राइक १४७.७४ आहे.
हेही वाचा: PBKS vs GT: “तर मी त्याला सणसणीत कानाखाली…” शुबमन गिलवर का भडकला सेहवाग?
१५ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स आणि RCB यांच्यात सामना होणार आहे
विराट कोहली आणि पाँटिंगच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दिल्ली कॅपिटल्सचे चाहते हा व्हिडिओ प्रचंड शेअर करत आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये, विराट कोहलीने बांगलादेश दौऱ्यावर चितगाव येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून रिंके पाँटिंगला मागे टाकले. कोहलीची वनडेमध्ये ४४ आंतरराष्ट्रीय शतके आहेत. तो सचिन तेंडुलकरच्या मागे आहे.