IPL 2023 Delhi Capitals: आयपीएल २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ खराब फॉर्मशी झुंजत आहे. नियमित कर्णधार ऋषभ पंतशिवाय संघाला पहिल्या चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. शनिवार, १५ एप्रिल रोजी संघ आरसीबी विरुद्ध पाचवा सामना खेळणार आहे. त्याआधी संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एक स्टार खेळाडू संघात परतणार आहे. सुरुवातीच्या पराभवानंतर ही बातमी संघ व्यवस्थापन आणि दिल्लीच्या चाहत्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरू शकते.
स्टार खेळाडू संघात परतणार…
आम्ही तुम्हाला सांगतो की जेव्हा संघ दिल्लीत या मोसमातील पहिला होम मॅच खेळला तेव्हा ऋषभ पंत स्टेडियममध्ये पोहोचला होता. आता पुन्हा एकदा तो टीमसोबत दिसला आहे. विशेष म्हणजे ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षण शिबिरात दिसला. खरं तर, दिल्ली आणि बंगळुरू शनिवारी बेंगळुरूमध्ये स्पर्धा करतील आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी तिथेच आहे, ज्यामध्ये ऋषभ पंतचे पुनर्वसनकरिता सुरू आहे. अशा परिस्थितीत त्याने आपल्या सहकाऱ्यांना भेटण्याची आणि संघाच्या शिबिरात सहभागी होण्याची संधी सोडली नाही. याशिवाय लग्नासाठी एक आठवड्याची रजा घेऊन गेल्या आठवड्यात मायदेशी परतलेला ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शही संघात परतला आहे.
मिचेल मार्शने मोसमातील सुरुवातीचे दोन सामने खेळले आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो गोल्डन डकवर बाद झाला. यानंतर गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने ४ चेंडूत केवळ ४ धावा केल्या. यानंतर तो लग्नासाठी मायदेशी परतला. आयपीएलपूर्वी भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत मार्शची बॅट ज्या प्रकारे तळपत होती, त्याच पद्धतीने तो दिल्ली कॅपिटल्ससाठी फलंदाजी करेल, अशी अपेक्षा होती पण ती सध्या फोल ठरली. त्याचवेळी डगआउटमधील पुन्हा एकदा ऋषभ पंतची उपस्थिती संघाचे मनोबल वाढवू शकते.
ऋषभ पंतने रिकव्हरीबाबत अपडेट दिले
आरसीबीविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पंतने संघाला प्रोत्साहन दिले आणि त्याच्या रिकव्हरीशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या. त्याच्या रिकव्हरीबद्दल पंत म्हणाला की, “मी बरा होत आहे आणि प्रत्येक नवीन दिवसाबरोबर तो बरा होत आहे. मी येथे एनसीएसाठी आलो आहे आणि दिल्ली कॅपिटल्स संघ देखील येथे उपस्थित आहे म्हणून मी संघाला भेटायला आलो. मला माझ्या सहकाऱ्यांसोबत राहून आनंद झाला. मी हे सर्व मिस करत होतो. मी मनापासून आणि आत्म्याने संघाशी जोडलेला आहे. संघाला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सलग चार पराभवांनंतर स्पर्धेत स्वतःला कायम ठेवण्यासाठी दिल्ली संघाला आरसीबीविरुद्ध कोणत्याही किंमतीत विजय मिळवायचा आहे.”