Rajasthan Royals vs Gujarat Titans Updates: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल २०२३चा ४८वा सामना ५ मे रोजी राजस्थानमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानला घरच्या मैदानावर पराभूत करत पहिल्या पराभवाचा बदला घेतला. त्याचवेळी आरआरचा मधल्या फळीतील फलंदाज रियान परागला या सामन्यात स्वत:ला सिद्ध करण्याची पुन्हा एकदा चांगली संधी मिळाली. त्याला हवे असते तर या संधीचे भांडवल करून तो हिरो बनू शकला असता. पण टायटन्सविरुद्धही रियान फ्लॉप ठरला. तो ६ चेंडूत केवळ ४ धावा करून बाद झाला.

राजस्थानचे चार फलंदाज बाद झाल्यावर पराग फलंदाजीला आला. संघाला त्याच्याकडून खूप आशा होत्या. मात्र तो केवळ चार धावा करून बाद झाला. या संपूर्ण मोसमात त्याने एकदाही फलंदाजी केली नाही. त्याने आयपीएल २०२३ मध्ये आतापर्यंत एकूण ६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ११.६०च्या सरासरीने फक्त ५८ धावा केल्या आहेत.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
Pat Cummins attend Coldplay concert with wife missed ODI series decider against Pakistan ahead of Border-Gavaskar Trophy Get Trolled
Pat Cummins: पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या मालिकेची तयारी सोडून कोल्डप्ले कॉन्सर्टला; ऑस्ट्रेलियाच्या विश्रांती देण्याच्या निर्णयावर टीका
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध प्रथम फलंदाजी केली. गुजरातच्या फिरकीपटूंनी राजस्थानच्या फलंदाजांची दयनीय अवस्था केली होती. परिस्थिती अशी बनली की सामान्यतः दुसऱ्या डावात इम्पॅक्ट खेळाडू उतरवणाऱ्या राजस्थानला फलंदाजीतच हा पर्याय निवडावा लागला आणि त्यासाठी रियान पराग मैदानात उतरला. राजस्थानची धावसंख्या केवळ ६३ धावांवर होती, जेव्हा त्याचे ४ विकेट्स पडल्या होत्या आणि तेव्हा रियान पराग मैदानात उतरला होता. रियानने १५ दिवसांपूर्वी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. अशा परिस्थितीत त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची यापेक्षा चांगली संधी क्वचितच असेल. मात्र, तसे होऊ शकले नाही आणि रियान पराग अवघ्या ६ चेंडूत बाद झाला.

अफगाणिस्तानचा अनुभवी फिरकी गोलंदाज राशिद खानने त्याच्याच चेंडूवर त्याला पायचीत बाद केले. मात्र असे असतानाही त्याने डीआरएस घेतला. जो त्याने खराब केला कारण तो बाद आहे स्पष्टपणे दिसत होते. राजस्थानलाही त्याचा फटका सहन करावा लागला. ध्रुव जुरेल पायचीत बाद झाला तेव्हा तो निर्णय खूप क्लोज आला होता. त्यावर जुरेलला रिव्ह्यू घेता आला असता. पण परागने रिव्ह्यू लवकर घेत तो वाया घालवला. आता राजस्थानसाठी रियान परागची ही शेवटची आयपीएल ठरू शकते.

हेही वाचा: Neeraj Chopra Wins Diamond league: गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, जगज्जेत्या पीटर्सला हरवून दोहा डायमंड लीग जिंकली

रियान परागने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “चांगले किंवा वाईट, वेळ निघून जातो.” तो कोणत्या टप्प्यातून जात आहे हे सांगण्यासाठी परागचे ट्विट पुरेसे आहे. सोशल मीडियावर तो ट्रोलही होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत ही वाईट वेळ लवकरात लवकर निघून जावी, अशी प्रार्थना केवळ परागच नाही तर त्याचे चाहतेही करत आहेत.

३.८० कोटींचा करार केला होता

रियान परागने २०१९ मध्ये राजस्थानसाठी आयपीएल पदार्पण केले आणि पहिल्या सत्रात त्याने काही प्रमाणात प्रभाव पाडला. त्यानंतर राजस्थानने त्याला संधी देणे सुरूच ठेवले. २०२२च्या हंगामापूर्वीच, राजस्थानने मेगा लिलावात रियान परागला ३.८० कोटी रुपयांना विकत घेतले. अशा परिस्थितीत रियान परागच्या सततच्या अपयशामुळे त्याच्यावर आणि राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.